घरताज्या घडामोडीपाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा बदलण्याचा?, मनसेचा व्यापाऱ्यांना धमकीवजा इशारा

पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा बदलण्याचा?, मनसेचा व्यापाऱ्यांना धमकीवजा इशारा

Subscribe

महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वाना समजते. इथे फक्‍त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.

राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठी अक्षरात आणि मोठ्या ठळक अक्षरात असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळात दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात अशा प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच दुकानांच्या पाट्या या मराठीत असणार आहेत. मराठी पाट्या असाव्यात अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही सुरुवातीपासूनची मागणी आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत या निर्णयाचे श्रेय मनसेचे असल्याचे गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. तर आता मराठी पाट्या कराव्यात अशी मनसेचीही मागणी आहे. व्यापाऱ्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. परंतु पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की, दुकानाच्या काचा बदलण्याचा खर्च जास्त आहे. असा धमकीवजा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात अशी मागणी मनसेकडून यापूर्वीही करण्यात आली होती. यासाठी मनेसैनिकांनी आंदोलनही केले होते. या आंदोलनात दुकानं बंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात मराठी भाषिकांचा असल्यामुळे दुकानावरील पाट्या या मराठीत असाव्यात अशी आक्रमक मागणी होती. कायद्यानुसारही दुकानाच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात असा नियम आहे. राज्य मंत्रिमंडळात मराठी पाट्यांबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मनसेनंही निर्णयाचे स्वागत करुन तात्काळ अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

मनसेचा धमकीवजा इशारा

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. “ज्या व्यापारांचा मराठी पाटी ला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा??” असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं असून धमकीवजा इशारा व्यापाऱ्यांना दिला आहे.

- Advertisement -

मराठी पाट्यांचे श्रेय मनसेचं – राज ठाकरे

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांववील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्‍त माइया महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वाचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंगलबजावणी नीट करा, ह्यात आणखी एक भानगड सरकारन॑ करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वाना समजते. इथे फक्‍त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.


हेही वाचा : याद राखा कोणाच्या भाकरीवर टाच आणाल तर योग्य नाही, जितेंद्र आव्हाडांचा किरण मानेंना मालिकेतून काढल्यावरून संताप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -