शिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका, मनसेची लतादीदींच्या स्मारकावरुन प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती. असे मनसेने म्हटल आहे.

Mns slams bjp over demand of lata mangeshkar monument in shivaji park maidan

गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांचे स्मारक उभारण्यावरुन राजकारण सुरु झालं आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी आता स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी भाजपने केली होती. यानंतर काँग्रेसकडूनही अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र मनसेचा लतादीदींच्या स्मारकाला विरोध असल्याचे दिसत आहे. लतादीदींचे स्मारक व्हावे परंतु दुसऱ्या ठिकाणी करण्यात यावे अशी काहींची मागणी आहे. शिवाजी पार्क मैदान खेळण्यासाठी असून यासाठी अनेकवेळा संघर्ष केला आहे. त्यामुळे राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका अशी विनंती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत लतादीदींच्या स्मारकावरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे. शासकीय इतमामात लता मंगेशकर यांच्य पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. शिवाजी पार्कात लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. मुंबईत खेळासाठी मोठे असे एकच मैदान उरले असून ते शिवाजी पार्क आहे. यामुळे राज्य सरकारने शिवाजी पार्कमध्ये स्मारक न उभारता पर्यायी जागेवर स्मारक करा अशी मागणी केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्मारकावरुन प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती. असे मनसेने म्हटल आहे.

शिवाजी पार्कला स्मशानभूमी करु नये

शिवाजी पार्कला स्मशानभूमी करु नये बाजूला चांगली मोठी स्मशानभूमी आहे. शिवाजी पार्क मुलांसाठी खेळायला चांगले आहे. या मैदानावर अनेक शाळा, महाविद्यालयांच्या खेळाचे आयोजन करण्यात येते. स्मारक उभारुन अतिक्रमण करणं योग्य वाटत नाही. स्मारक उभारण्यासाठी मुंबईत इतर ठिकाणीसुद्धा जागा आहेत. असे वंचित बहूजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.


हेही वाचा : लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण? शिवाजी पार्कातच व्हावे स्मारक