पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे.., मनसेचा संजय राऊतांना खोचक टोला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची १०० दिवसानंतर सुटका झाली आहे. त्यांच्या सुटकेनंतर शिवसेनेकडून जल्लोष साजरा केला जात आहे. जेलमधून सुटका झाल्यानंतर आजपासून संजय राऊत पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोडमध्ये आलेले दिसत आहे. राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, मनसेकडून संजय राऊतांना खोचक टोला लगावण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्या सुटकेनंतर टायगर इज बॅक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिवसैनिक आणि संजय राऊतांच्या समर्थकांकडून येत होत्या. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत नॉट आऊट असं वक्तव्य केलं आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. परंतु मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे.

गजानन काळेंचं ट्वीट काय?

कालचा पिंजऱ्यातील वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता, अशा शब्दांत गजानन काळे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली. तर सूर बदले बदले है जनाब के… राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील… लवंडे जोमात, मातोश्री कोमात…,अशा शब्दांत काळेंनी सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्षपणे खोचक टीका केली आहे. दरम्यान, या टीकेनंतर पुन्हा एकदा ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : …राऊतांना पुन्हा गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, उद्धव ठाकरेंचा केंद्रीय यंत्रणांवर निशाणा