घरताज्या घडामोडीअमित ठाकरेंकडून विद्यार्थी संघटनेची पुनर्बांधणी; प्रत्येक महाविद्यालयात 'मनविसे'चे युनिट

अमित ठाकरेंकडून विद्यार्थी संघटनेची पुनर्बांधणी; प्रत्येक महाविद्यालयात ‘मनविसे’चे युनिट

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNSU) अध्यक्षपद स्विकारल्यानंतर विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणी सुरूवात केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNSU) अध्यक्षपद स्विकारल्यानंतर विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणी सुरूवात केली आहे. त्यानुसार, प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची विद्यार्थी कार्यकारिणी (स्टुडंट्स युनिट) स्थापन करण्यावर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी भर दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या इनिंगपासून म्हणजे झेंड्यात आणि चिन्हात करण्यात आलेल्या बदलांनंतर अमित ठाकरे सुद्धा राजकारणात सक्रिय झाले आहेत. मागील अनेक काळापासून त्यांनी महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दौरे करत तेथील स्थानिकांची भेट घेऊन, समस्यांची चौकशी केली. शिवाय, गेल्या आठ दिवसांत अमित ठाकरे यांनी मुंबईतील १९ विधानसभा मतदार सुमारे ३,५०० हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मनविसे’च्या पुनर्बांधणीला सुरूवात; अमित ठाकरेंकडून नव्या चेहऱ्यांना संधी

युनिट स्थापन करण्यासाठी कामाला लागा

- Advertisement -

या संवादावेळी अमित ठाकरे यांनी ‘तुमच्या महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे युनिट स्थापन करण्यासाठी कामाला लागा’, अशा सूचना मनविसेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, “विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे विषय समजून घेऊन शैक्षणिक समस्या सोडविण्यावरच भर द्यावा”, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

अमित ठाकरेंच्या या सुचनांनंतर मनविसेचे पदाधिकारी आणि मनविसेत नव्याने सामील होऊन काम करू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन तरुण तरुणींशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेत आहेत.


हेही वाचा – तुझी हत्या होणार आहे, दाऊद टोळीकडून साध्वी प्रज्ञा यांना धमकीचा फोन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -