घरताज्या घडामोडीमाणगाव तालुक्यात तालुकाध्यक्ष आणि मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

माणगाव तालुक्यात तालुकाध्यक्ष आणि मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Subscribe

राज्यभरातच नव्हे तर अख्या भारत देशात सध्या धार्मिक स्थळावर लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकर (भोंग्यावरून) महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे.मनसे अध्यक्ष हिंदुजनायक राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळावरील भोंगे हा धार्मिक प्रश्न नसून सामजिक प्रश्न आहे असे संभाजीनगर येथील सभेत ठणकावून सांगत.मशिदीवरील भोंगे जर बंद होणार नसतील तर ४ मे पासून त्या भोंग्यासमोर दुप्पट आवाजात “हनुमान चालीसा” वाजवा असे आदेश मनसैनिकांना दिले. त्यांनतर राज्य प्रशासन तयारीत राहिले.

३ मे रोजी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकारी यांना नोटिसा बजावण्यात आल्या.सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून दक्षतेचा उपाय म्हणून मनसे च्या विविध पदाधिकारी यांना पोलीसांनी ताब्यात देखील घेतले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे माणगाव तालुक्यातुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड,उपजिल्हाअध्यक्ष सुबोध जाधव,माणगाव तालुका अध्यक्ष प्रतिक रहाटे,मनसे जिल्हा माथाडी कामगार अध्यक्ष संजय गायकवाड, म. न.वि. से. उपजिल्हाध्यक्ष गोपाळ पवार,म. न.वि. से.उप तालुकाध्यक्ष रोहन कांबळे.या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ पदाधिकारी यांना माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर अस्मितापाटील,पो.शि.रामनाथ डोईफोडे, पो. ह रावसाहेब कोळेकर यांनी ४ मे रोजी माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील एस टी उपहारगृह येथून जेवण करत असताना सामजिक सुरक्षेचा उपाय म्हणून दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले व त्यांना माणगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. त्यांना १४९ ची नोटीस देऊन प्रतिबंधात्मक वकार्यवाही करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये साम्य आहे – देवेंद्र फडणवीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -