Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मोबाईल हँडसेट, उपकरणांना अत्यावश्यक सेवेतील यादीत समाविष्ट, मनसेची मागणी

मोबाईल हँडसेट, उपकरणांना अत्यावश्यक सेवेतील यादीत समाविष्ट, मनसेची मागणी

संबंधित व्यक्ती आपल्या जवळ सॅनेटायझर बाळगतील व वेळावेळी हात स्वच्छ करतील आणि सामाजिक अंतराचे मानंदडाचे पालन करतील.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने १ मे पर्यंत लॉकडाऊन केला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत हा लॉकडाऊन जाहीर केला असून कोरोनाची साखळी रोखण्याबाबत उपाययोजना केली जात आहे. परंतु मनसेकडून टेलिकॉम सर्विसला परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. लॉकडाऊन केला असल्याने अनेक नागरिक घरात राहून काम करत आहेत. घरुन काम करण्यासाठी सर्वांना टेलिकॉम,मोबाई हँडसेट, उपकरणांसंबंधित काम असल्यास त्यांना तात्काळ उपलब्ध होणार नाहीत. यासाठी टेलिकॉम सर्विसमधील उपकरणांना आणि सेवा देणाऱ्यांना आवश्यक यादीत समावेश करावा अशी मागणी मनसे टेलिकॉम सेनेने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.

मनसेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, टेलिकॉम सेवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मानवी जीवनाचा एक दैनंदिन भाग बनला आहे. यामध्ये कार्यालयीन व्यक्‍ती, विद्यार्थी, छोटे व्यवसायिक, गृहनिर्मात्यांसह प्रत्येक जण डिजिटल विश्‍वाकडे आकर्षित झाला आहे. जसे आपण आपल्या हॅण्डसेट किंवा लॅपटॉप / संगणका शिवाय काही तास वेगळे राहू शकत नाही. आज नविन ”कोविड” युगात घरात राहून, घरातूनच कामकरण्याचा मार्ग अवलंबला गेला असून आता घरातूनच कामकरणे हा जीवनाचा एक भाग बनला आहे. पण ज्यावेळी आपल्याकडे मोबाईल फोन, टॅबलेट, डोंगल, लॅपटॉप ई-मेल यासारख्या संदेशाचे आदान-प्रदान करणारे डिजिटल साधनेच नसतील तर टेलिकॉम नेटवर्क वापरण्याचा काय उपयोग?

- Advertisement -

टेलिकॉम साधनांच्या शिवाय आपण आय.टी. (IT) उद्योगाची कल्पनाही करू शकत नाही. तसेच आता शाळासुध्दा ऑन लाईन सुरू आहेत, ज्यात टेलिकॉम साधने एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळेच प्रत्येक घरात एका पेक्षा अधिक टेलिकॉम साधने ठेवणे भाग पडत आहे, जसे प्रत्येक व्यक्‍तीला आपल्या कामासाठी, अभ्यासासाठी उपकरणाचा उपयोग करावा छागत आहे. तसेच आता ज्येष्ठ नागरिक व तरूण वर्ग हे वेब सिरिज सारख्या कार्यक्रमाद्वारे आपले मनोरंजन करीत आहेत.

यामुळेच टेलिकॉम साधने विक्रेते आपल्या जवळपास असणे आवश्यक आहे, यामध्ये उपकरणे विक्रेते, स्वॉप्टवेअर विक्रेते, स्टॅंड, कर्व्हस, बॅटरी पॅक, हेड फोन्स इत्यादी वस्तूंचा पुरवठा करणारे/विक्रेते आपल्या आवश्यक वस्तूंच्या यादीतील महत्वाचा भाग बनले आहेत. शासनाने वरील बाबींवर लक्ष देत मोबाईल हॅण्डसेट आणि उपकरणे यांना आवश्यक सेवेत समाविष्ट करावे ही आमची शासनास याद्वारे विनंती आहे.

- Advertisement -

आम्हांला निश्‍चितच समजते की, या साथीच्या रोगात सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे, ज्या प्रमाणे खाद्य दुकाने, होम डिलिव्हरी यांना जास्तीत जास्त स्परशीहिन पेमेंट प्रणालीची
‘परवानगी’ दिली त्याप्रमाणे आम्ही ही त्याचे पालन करू.

आम्ही एक योग्य ऑपरेटिंग पध्दत वापरू ती पुढील प्रमाणे :

९ मे रोजी लॉकडाऊन उघडल्यानंतर आमचे अभियंते, टेक्निशियन आणि वितरक एजंट यांना त्वरित (किमान प्रथम डोस) लसी दिल्या जातील.

ते ग्राहकांच्या सोबत बोलताना दोन मास्कचा वापर करून बोलतील.

सर्व सेवा शक्‍यतो स्थानिक सोसायट्यांच्या लॉबीमध्ये पुरविल्या जातील.

देय स्विकारताना शक्‍यतो ते गुगल पे, पेटीएम, अन्य वॉलेट्स, युपीआय व बॅक ट्रान्सफर या सारख्या स्पर्शहिन मार्गाने स्विकारले जातील.

वरील सर्व संबंधित व्यक्ती आपल्या जवळ सॅनेटायझर बाळगतील व वेळावेळी हात स्वच्छ करतील आणि सामाजिक अंतराचे मानंदडाचे पालन करतील.

साधने वितरित करते वेळी बॉक्स व बॅग स्वच्छ सेनेटायज केले जातील.

आम्हांस पूर्ण विश्‍वास आहे की, आम्ही केलेल्या विनंतीवर शासन व संबंधित अधिकारी वर्ग योग्य विचार कराला, ज्यामुळे या व्यवसायासंबंधित असलेल्या कामगार व वितरक वर्गाचा उपजिविकेचा प्रश्‍न सुटेल. तसेच याकठीण काळात टेलिकॉम हार्डवेअर आणि ऑक्सेसरीज उद्योगास पुर्नजीवन मिळेल असे पत्र मनसेन टेलिकॉम सेनेने राज्य सरकारला लिहिले आहे.

- Advertisement -