घरमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत? मराठी स्क्रीन्ससाठी मनसेचा हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत? मराठी स्क्रीन्ससाठी मनसेचा हल्लाबोल

Subscribe

पठाण या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसताना जितेंद्र आव्हाड कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई – बॉलिवूड किंग शाहरूख खानचा पठाण चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तुफान गल्ला जमवला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाचे बुकिंग फुल्ल झाले होते. परंतु, या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना वेळ मिळत नाहीय. सध्या वाळवी, वेड आदी मराठी चित्रपट सुरू आहेत. मात्र, पठाणमुळे या चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची तक्रार संबंधित चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी केली आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं आहे.
‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?, असा सवाल खोपकरांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांचा आवाज असलेला हरहर महादेव या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. तसंच, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी ठिकठिकाणी या चित्रपटाविरोधात निदर्शने केली होती. राजकीय हेतुने या चित्रपटाला विरोध होत असल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता. चित्रपटाचा शो बंद पाडताना जितेंद्र आव्हाडांनी एका प्रेक्षकाला मारहाणही केली असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. हे प्रकरण आता शांत झालेलं असतानाच मनसेच्या अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र डागलं आहे
आता पठाण या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसताना जितेंद्र आव्हाड कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -