घरमहाराष्ट्रबोलावे मोजके..., भावी आणि मावळत्या राज्यपालांना मनसेने करून दिले संतवाणीचे स्मरण

बोलावे मोजके…, भावी आणि मावळत्या राज्यपालांना मनसेने करून दिले संतवाणीचे स्मरण

Subscribe

मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातून निरोप देण्यात आला आहे. आज ते त्यांच्या मूळ गावी देहरादून येथे प्रस्थान करणार आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी करा अशी मागणी विरोधी पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही केली होती. ही मागणी मान्य होताच सर्वांनी आनंद व्यक्त केला. त्यातच, आज त्यांच्या निरोपावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिश्किल टीप्पणी करत त्यांना निरोप दिला आहे. तसंच, येणाऱ्या भावी राज्यपालांनाही त्यांनी अभंगाच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी जानेवारी महिन्यातच निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपण राजीनामा पाठवला असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच स्वीकारला असून राज्यपाल पदाच्या गादीवर आता रमेश बैस बसणार आहेत. त्यांचा उद्या शपथविधी सोहळा होणार असून भगतसिंह कोश्यारी यांनी आजच निरोप घेतला आहे. या निरोपावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खुमासदार शैलीत भगतसिंह कोश्यारी यांना सूचना वजा निरोप दिला आहे.

- Advertisement -

मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्वीट केले आहे.

निरोप देतो तुम्हा आता आज्ञा असे…
चुकले तुमचे (सर्व) काही म्हणोनी क्षमा नसे!
मावळत्या आणि भावी महामहिम राज्यपाल महोदयांनी, महाराष्ट्रातून जाताना किंवा येण्यापूर्वी इथल्या संतवाणीचं स्मरण ठेवावं… इतकीच ‘माफ’क अपेक्षा!

- Advertisement -

हे ट्वीट करतानाच त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा एक अभंगही पोस्ट केला आहे. घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी हा अभंग असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मनसेने त्यांना टोला लगावला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी यापुढे बोलताना काळजी घ्यावी, असा इशाराच त्यांनी या अंभगाच्या माध्यमातून दिला असावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -