राज सभेच्या पूर्वसंध्येला वसंत मोरेंचं फेसबुक लाईव्ह, MNS पार्ट टाईम कार्यकर्त्यांविरोधात नाराजी व्यक्त

MNS Vasant More Reveal Internal disputes before raj thackeray rally in pune
राज सभेच्या पूर्वसंध्येला वसंत मोरेंचं फेसबुक लाईव्ह, MNS पार्ट टाईम कार्यकर्त्यांविरोधात नाराजी व्यक्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. परंतु या सभेच्या पूर्वसंध्येलाच मनसे माजी पुणे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह करत त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या सभेपूर्वी पुन्हा एकदा पुणे मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनसेतील पार्ट टाईम कार्यकर्ते मी बांधलेल्या टीमच्या विरोधात काम करत असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. पुण्यात जी मी टीम उभारली होती त्याचे खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. झारीतले शुक्राचार्य कोण? दरम्यान वसंत मोरे आणि निलेश माझिरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवल्यात आली असे वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे.

मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेच्या पूर्वसंध्येला फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्यांनी मनसेच्या पार्ट टाईम कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. पुण्यातील मनसे माथाडी कामगार सेनेच्या पदावरुन निलेश माझिरे यांना हटवण्यात आले. त्यांनी पुण्यात माथाडी कामगार सेनेचं अस्तित्व असल्याचे दाखवून दिले आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक काम करण्यात आली आहेत. परंतु एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल करुन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. यानंतर त्यांचे पद काढून दुसऱ्या कार्यकर्त्याला मुंबईला पाठवले आणि त्याच्याकडे पदभार दिला. मनसेतील पार्ट टाईम कार्यकर्त्यांचे हे काम आहे. असे वसंत मोरे म्हणाले आहेत.

माझ्यापेक्षा निलेशला धक्का – वसंत मोरे

आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्यापेक्षा हा निलेश माझिरे याला जास्त धक्का बसला आहे. खोट्या बातम्या पसरवून निलेश माझिरेंना डावलण्यात आले आहे. मनसेमध्ये काही पार्ट टाईम कार्यकर्ते आहेत. त्यांना फार घाई लागली आहे. छोटे छोट्या गोष्टींसाठी हे लोकं राज ठाकरेंकडे जात असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंना त्रास होईल अशी कार्यकर्त्यांची कामे

मनसेतील पार्ट टाईम कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्रास होईल अशी काम करत आहेत. माझ्याबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा तुमचे नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी करा असे खडेबोल वसंत मोरे यांनी मनसेतील पार्ट टाईम कार्यकर्त्यांना सुनावले आहेत. राज ठाकरेंना त्रास देण्यासारखी काम करणं टाळा, फ्रस्ट्रेटेड होऊन लढू नका, प्रत्येक लहान गोष्टीसाठी राज ठाकरेंकडे जाण्यासाठी तुम्ही लहान आहेत का? ज्या मागे झाल्या त्या गोष्टींसाठी तुम्हीच जबाबदार आहात असे आरोप वसंत मोरे यांनी केले आहेत. वसंत मोरे यांच्या फेसबुक लाईव्हमुळे पुण्यात मनसेमध्ये वाद असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.


हेही वाचा : “आधी किमती वाढवायच्या…”; पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीवर मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर पलटवार