घरमहाराष्ट्रभाजपसोबत युती नाही, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार

भाजपसोबत युती नाही, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार

Subscribe

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती होणार नसून मनसे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहेत. यासंदर्भातील माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती. यानंतर मनसे-भाजप युतीची चर्चा सुरु होत्या. मात्र, या चर्चांना पूर्णविराम मनसेने दिला आहे.

संदीप देशपांडे आणि मनसे अमित ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम घडवून पुन्हा एकदा आम्ही नाशिकमध्ये कमबॅक करणार आहोत. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल, असा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे. दत्तक घेऊ ही योजनाही फेल गेली आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

- Advertisement -

भविष्यात अधिक सुंदर नाशिक घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. याकरीता आम्ही तयारी सुरू केली आहे. काही पक्ष असतात काम एक रूपयाची करतात शंभर रूपयांची मार्केटींग करतात. आम्ही कामं शंभर रूपयांची केली मात्र मार्केटींग करू शकलो नाही, ती आमची चुक झाली असावी असं सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -