Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Mob attack on Mumbai Police : संभाजीनगरमध्ये मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला

Mob attack on Mumbai Police : संभाजीनगरमध्ये मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला

Subscribe

मुंबईतील दहिसर पोलिसांच्या पथकावर छत्रपती संभाजीनगरमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना वैजापूर येथील एका गावात घडली. पोलीस भरती घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनांवर ३० ते ३५ आरोपींनी तुफान दगडफेक करत हल्ला केल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारी रात्री सायंकाळच्या दरम्यान घडली.

पोलीस घोटाळ्यातील संशयित आरोपींना देखील जमावाने पळवून लावल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पोलीस भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुंबईतील दहिसर पोलिसांचं एक पथक संभाजीनगरातील वैजापुरात दाखल झालं होतं. त्यावेळी आरोपींचा शोध घेतला जात असतानाच ३० ते ३५ आरोपींनी पोलिसांवर आणि पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक करत हल्ला चढवला. दरम्यान गावात गेल्यावर आरोपींच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करत जमाव जमा केला आणि लाठ्या-काठ्यांच्या साहाय्याने जमवाकडून पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी वैजापुरातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं, परंतु जमावाने पोलिसांच्या वाहनांवर हल्ला करत दोन्ही आरोपींना घटनास्थळावरून पळवून लावलं. त्यानंतर दहिसर पोलिसांनी थेट वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत मारहाणीची तक्रार दाखल केली. तसेच या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा : माजी नगरसेवकाकडून एसटी चालकास मारहाण, माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


 

- Advertisment -