घरमहाराष्ट्रआता मोबाईल पोलीस ठाणे तुमच्या भेटीला

आता मोबाईल पोलीस ठाणे तुमच्या भेटीला

Subscribe

अहमदनगर येथील गावकऱ्यांना आता आपल्या समस्या किंवा तक्रारी सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज भासणार नाही. कारण आता चक्क पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गावागावत येऊन गावकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत.

पोलीस ठाणे म्हटले की भल्या भल्यांची बोलती बंद होते. एखाद्या व्यक्तीशी वाद झाला किंवा छेडछाड काढली गेली तरी काही माणस घाबरुन पोलीस ठाण्याची पायरी चढत नाहीत. मात्र आता गावकऱ्यांना घाबरुन जाण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ देखील त्यांच्यावर येणार नाही. कारण आता मोबाईल पोलीस ठाणे तुमच्या भेटीला येणार आहे. अहमदनगर येथे थेट पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावागावात येणार असल्याचे समोर आले आहे. येत्या शनिवार पासून हे फिरते मोबाईल पोलिस स्टेशन सुरू करण्यात येणार आहे.

नेमकी काय असणार आहे ही संकल्पना?

मोबाईल पोलिस ठाणे या संकल्पनेत जिल्ह्यातील एकूण ३० पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. या प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांची गावे निश्चित करुन देण्यात आली असून त्यानुसार त्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या-त्या गावात जाऊन गावकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी गावात फिरते माबाईल पोलिस स्टेशन जाणार असून प्रत्येक पोलीस स्टेशनला महिन्याभरात चार गावांत जाऊन हा उपक्रम राबवायचा आहे. त्याप्रमाणे वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले आहे. गावकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडवणे, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे अशा समस्या पोलिस सोडवणार आहेत. तसेच प्रत्येक गावात शांतता कमिटी असते. या शांतता कमिटीची बैठक देखील त्याच दिवशी भरवण्यात येणार असून त्यांच्या कमिटी सदस्यांसोबत गावातील सरपंच देखील त्यात सहभागी असणार आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांना समस्या नोंदवण्याकरता पोलीस ठाण्यात जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आता गावातील किरकोळ समस्या सोडवण्यासाठी गावात पोलीस हजर राहणार आहेत.

- Advertisement -

कोणाची आहे ही संकल्पना?

अहमदनगर येथील पोलीस अधिक्षक रंजन कुमार शर्मा हे नेहमीचे पोलीस दलात वेगवेगळे संकल्प राबवित असतात. त्याचप्रमाणे आता फिरते मोबाईल पोलीस ठाणे देखील येत्या शनिवारपासून सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -