स्वातंत्र्यदिनी आकाशवाणी परिसरात फायरिंग;  नागरिकांमध्ये घबराट, मॉक ड्रिल समजल्याने सोडला निःश्वास 

maharashtra police

गंगापूर रोडवरील आकाशवाणी परिसरात शनिवारी (दि.15) सायंकाळी फायरिंगचा आवाज आल्याने सुरू आल्याचे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. नागरिकांनी विचारपूस केली असता स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जमाव नियंत्रणाच्या सरावासाठी नाशिक शहर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाकडून मॉक ड्रिल आल्याचे समजले सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांकडून ऑलआऊट मिशन, रात्रगस्त, पेट्रोलिंग, मॉक ड्रिल केले जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अघटित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी देशभर अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकमध्येही स्वातंत्र्यदिनानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आकाशवाणी परिसरात पोलीस व दंगा नियंत्रण पथकाने शनिवारी सांयकाळी मॉक ड्रिल केले. मात्र, परिसरात अचानक धावपळ व फायरिंग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधत फायरिंग व धावपळ सुरू असल्याचे सांगितले असता पोलिसांकडून मॉक ड्रिल असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.