घरदेश-विदेशकोरोनाविरोधातील लढ्यासाठी आज रंगीत तालीम, देशभरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी आज रंगीत तालीम, देशभरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल

Subscribe

Mock Drill | मॉकड्रिल घेण्याकरता आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्याच्या आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मॉकड्रिल पार पाडल्यानंतर रिपोर्ट केंद्राकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, थर्मल स्कॅनर ऑक्सीमीटर, मास्क, सॅनिटायजर आदींचा साठा वाढवण्याच्या सूचनाही केंद्राकडून करण्यात आल्या आहेत.

मुंबई – चीनमध्ये कोरोनाचा (Corona Virus) संसर्ग वाढल्याने भारतातही खबरदारीची पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसंच, रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यता आले आहे. संभाव्य परिस्थितीत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत याकरता केंद्राकडून आज देशातील सर्व महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.

मॉकड्रिल घेण्याकरता आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्याच्या आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मॉकड्रिल पार पाडल्यानंतर रिपोर्ट केंद्राकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, थर्मल स्कॅनर ऑक्सीमीटर, मास्क, सॅनिटायजर आदींचा साठा वाढवण्याच्या सूचनाही केंद्राकडून करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाची दहशत! परदेशातून येणाऱ्यांसाठी ‘या’ नव्या गाईडलाईन्स

देशभरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. परंतु, खबरदारीचा उपाय आखणं गरजेचं आहे. कोविड सेटंर होते तिथे गॅस प्लान्टपासून ते डॉक्टर, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर, कॉन्सेंट्रेटर सारख्या सुविधांची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहे. येत्या काळात कोरोना परिस्थिती गंभीर झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात सुरू करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय पर्यटकांवर लक्ष

केंद्राने जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्स चीनसह ज्या देशांमध्ये सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी लागून करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता परदेशातून भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांना आता पुन्हा एअर सुविधा फॉर्म भरण अनिवार्य असणार आहे. या फॉर्ममध्ये 72 तास आधी केलेली आरटीपीसीआर चाचणीची माहिती देणं आवश्यक आहे.

प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळातून येणाऱ्या काही प्रवाशांची रँडमली कोविड चाचणी करण्यात येत आहे. केंद्राच्या माहितीनुसार, संबंधित विमानात येणाऱ्या कोणाचीही चाचणीसाठी निवड केली जाईल, प्रत्येक फ्लाईटमधील किमान 2 टक्के लोकांची यात चाचणी होईल. सँपल दिल्यानंतर या प्रवाशांना विमानतळावरून सोडण्यात येईल. जर यातील एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्यांच्या रक्ताचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -