घरमहाराष्ट्रराजभवनात मॉडेलचे फोटो शूट, राज्यपाल कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

राजभवनात मॉडेलचे फोटो शूट, राज्यपाल कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

Subscribe

मुंबई : कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकतच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर 26/11 मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून केले अभिवादन केले. त्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. आता एका मॉडेलने राजभवनावर फोटो शूट केल्याचे समोर आले आहे. खुद्द मॉडेलनेच हे फोटो सोशल मीडीयावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maera Misshra (@maeramishra)

- Advertisement -

राज्यपाल कोश्यारी आणि वाद हे समीकरण झाले आहे. गुजराती किंवा राजस्थानी लोक सोडून गेले तर आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची तशी ओळख राहणार नाही, असे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात त्यांनी माफीदेखील मागितली. शिवाय, माध्यमांशी न बोलण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे खुद्द राज्यपाल कोश्यारी यांनीच सांगितले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी देखील राज्यपालांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या काळाबद्दल बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरीपर्यंत आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले होते.

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारींच्या गच्छंतीची चर्चा रंगू लागली आहे. अशातच राजभवनात एका मॉडेलने फोटो शूट केल्याचे आता समोर आले आहे. मायरा मिश्रा असे या मॉडेलचे नाव असून ती अभिनेत्री देखील आहे. तिने सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले आहेत. आता यासाठी मॉडेलकडून खास फोटो शूट करण्यात आले की, राज्यपाल भेटीच्या प्रतीक्षेदरम्यान हे फोटो काढण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

- Advertisement -

गुजरात निकालानंतर राज्यपालांची पाठवणी?
सातत्याने केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरातून राज्यपाल कोश्यारी हटाव अशी एकमुखी मागणी होऊ लागली. राज्यपालांनीही काही नेत्यांकडे तसेच जाहीरपणे माघारी जायची इच्छा व्यक्त केली आहे. अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेच्या वतीने युवा प्रेरणा शिबिरात बोलत असताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. आता 8 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्यांची पाठवणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -