घरताज्या घडामोडीModi Cabinet Expansion : नारायण राणेंकडे लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाचे खातं,...

Modi Cabinet Expansion : नारायण राणेंकडे लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाचे खातं, कोणाला कोणती जबाबदारी वाचा एका क्लिकवर

Subscribe

भागवत कराड यांना अर्थ राज्यमंत्री पदाची जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. एकूण ४३ नेत्यांनी राष्ट्रपती भवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राताली मंत्र्यांसह १२ मंत्र्यांनी पदाचा राजीनामा घेतला आहे. मोदींनी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिला आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भाजप नेते नारायण राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाचे खातं देण्यात आली आहे. तर भागवत कराड अर्थ राज्यमंत्री तर भाजप नेते रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्री पदाची धुरा देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये खातं वाटप जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणत्या खात्याची जबाबदारी कोणाला देण्यात आली आहे.

- Advertisement -

कोणत्या खात्याची जबाबदारी कोणाला

स्मृती इराणी यांना महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री पदाची जबाबदारी

अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी

- Advertisement -

पीयूष गोयल यांच्याकडे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची जबाबदारी

धर्मेंद्र प्रदान केंद्रीय शिक्षणमंत्री

हरदिपसिंग पुरी यांच्याकडे शहरी विकास आणि पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी

ज्योतिरादित्य सिंदिया – हवाई वाहतूक मंत्री

पंतप्रधान मोदींकडे विज्ञान तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी

पुरुषोत्तम रुपालांकडे दूध आणि मत्स्य मंत्रालय

डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्याकडे महिला बालकल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी

पियुष गोयल यांचे रेल्वेमंत्री पद काडून वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी

मिनाक्षी लेखी- राज्य मंत्री, परराष्ट्र मंत्रालय तसेच सांस्कृतिक मंत्रालयाचे खातं

गिरीराजसिंह केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री पदाची जबाबदारी

पशुपती पारस नवे अन्न व प्रक्रिया मंत्री

अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी

स्मृती इराणीकडे महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाची जबाबदारी

भूपेंद्र यादव यांच्याकडे कामगार आणि पर्यावरण मंत्रालयाी जबाबदारी

किरण रिजेजू यांच्याकडे सास्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी

सर्बानंद सोनवाल यांच्याकडे ईशान्य विकास तसेच आयुष मंत्रालयाची जबाबदारी

नारायण राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी

भागवत कराड अर्थ राज्यमंत्री

रावसाहेब दानवे – रेल्वे राज्यमंत्री

भारती पवार यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी

पशुपती कुमार पारस नवे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री

गजेंद्र सिंह शेखावत नवे केंद्रीय जलशक्ती मंत्री

राजकुमार सिंग नवे केंद्रीय ऊर्जामंत्री

राज्यमंत्रीपदी कोणाची वर्णी

निसिथ प्रामाणिक – गृह राज्यमंत्री, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री
अनुप्रिया पटेल – उद्योग राज्यमंत्री
एस.पी.बघेल – कायदा व न्याय राज्यमंत्री
राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
शोभा करलंदजे – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
दर्शन जरदोश – टेक्सटाईल, रेल्वे राज्यमंत्री
मीनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री
अन्नपूर्णा देवी – शिक्षण राज्यमंत्री
अजय भट – संरक्षण, पर्यटन राज्यमंत्री
अजय कुमार – गृह राज्यमंत्री
भगवंत खुबा – अपारंपारिक ऊर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री
कपिल पाटील – पंचायत राज राज्यमंत्री
प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय राज्यमंत्री
सुभास सरकार – शिक्षण राज्यमंत्री
राजकुमार रंजन सिंह – परराष्ट्र विभाग आणि शिक्षण राज्यमंत्री
विश्वेश्वर टुडू – आदिवासी विकास आणि जलशक्ती विभाग राज्यमंत्री
शांतनु ठाकूर – बंदर, जलवाहतूक राज्यमंत्री
मुंजपरा महेंद्र – महिला व बालकल्याण आणि आयुष विभाग राज्यमंत्री
जॉन बारला – अल्पसंख्यांक राज्यमंत्री
एल. मुरुगन – मासेमारी, पशुपाल आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री, माहिती प्रसारण राज्यमंत्री

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -