घरताज्या घडामोडीCorona Alert : राज्याला १५ धोक्याचे, छोटीशी चूक भयंकर ठरु शकते, मोदी...

Corona Alert : राज्याला १५ धोक्याचे, छोटीशी चूक भयंकर ठरु शकते, मोदी सरकारचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Subscribe

रोना नियमांचे कठोर पालन करण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करावे.

राज्यात आणि देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव अधिक तीव्र होणार असल्यामुले कोरोनाची तिसरी लाट या महिन्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून महाराष्ट्रात सणासुदीचा काळ सुरु होतो. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरण्याची शक्यता आहे. यामुळे मोदी सरकारकडून देशातील सर्व राज्यांना ऑगस्टमधील १५ दिवस धोक्याचे असून अधिक खबरदारी बाळगण्याच्या सुचान देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिनवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सावधानतेचा इशारा दिला आहे.

देशात ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. यामुळे १९ ऑगस्टपासून ते १५ ऑक्टोबर या कालावधीतील १५ दिवस अधिक घोक्याचे असल्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवसांत केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारला कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे दिवस सणाचे असल्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना म्हटलं आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगली पाहिजे. सणांचे दिवस असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे या सणांच्या दिवसांमध्ये गर्दी कशी टाळाता येईल याबाबत दक्षता घेतली पाहिजे. कोरोना नियमांचे कठोर पालन करण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करावे. कारण या दिवसांत छोटीशीही चूक झाल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

कोरोनाची तिसरी लाट राज्यासाठी आणि देशासाठी घातक ठरु शकते. दिवसाला देशात एक लाख रुग्ण आढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे जर या कालावधीत छोटी चूक झाली तर परिस्थिती बिकट होऊन दिवसाला २ लाख रुग्णांचा आकडा होऊ शकतो यामुळे सर्व राज्यांना केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

हे आहेत ते १५ दिवस

१९ ऑगस्ट मोहरम
२१ ऑगस्ट : ओणम
३० ऑगस्ट : जन्माष्टमी
१० सप्टेंबर : गणेश चतुर्थी
५ ते १५ ऑक्टोबर : दुर्गा पूजा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -