घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे..., वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray : मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे…, वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Subscribe

पेण : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता. 01 फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पावर नेहमीप्रमाणे टीका केली आहे. तर आजपासून कोकणच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांची पेणमध्ये सभा झाली असून या सभेतून त्यांनी अर्थसंकल्पावर कडाडून टीका करत मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार आहे, असा टोला लगावला आहे. (Modi government’s budget means…, read what Uddhav Thackeray said?)

हेही वाचा… Uddhav Thackeray : अर्थमंत्री सीतारामन यांचा ‘शेवटचा’ अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंचा टोला

- Advertisement -

पेणमधील भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पाबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही यंदाच्या अर्थसंकल्पातून महिलांवर लक्ष देत आहात. पण मग मणिपूरमध्ये का गेला नाहीत? त्यांना सांगा आमच्या देशात महिला आहेत हे आम्हाला माहीत नव्हते. पण निवडणुकांमध्ये महिलांची मते हवी आहेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आता महिलांसाठी काम करणार. बिल्किस बानोकडे जा, त्यांच्या अत्याचाऱ्यांना सोडले होते. त्यांना सांगा आम्ही तुझ्यासाठी काम करणार आहोत. शेतकऱ्यांनी जेव्हा वर्षभर आंदोलन केले त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवले होते. आता अतिरेक्यांना शेतकरी समजत आहात. हा सगळा भुलभुलैय्या आणि थोतांड आहे, अशी सडेतोड शब्दांत उद्धव ठाकरेंनी सुनावले आहे.

तर, पूर्वी जादूचे प्रयोग व्हायचे, अजूनही होत असतील. जादूगार कसे प्रयोग दाखवतो तुम्ही पाहिले नसेल तर दिल्लीत जे जादूचे प्रयोग सुरू आहेत ते बघा. जादूच्या प्रयोगांत मी लहान असताना बघायचो, जादूगार यायचा रिकामी टोपी दाखवयाचा त्यावर फडके ठेवायचा आणि एक मंत्र म्हणायचा, आबरा का डबरा. त्यानंतर रिकाम्या टोपीत हात घालायचा आणि कबूतर काढून दाखवयाचा. हवेत ते कबूतर उडवायचा. आपण म्हणायचो हा अचाट माणूस आहे रिकाम्या टोपीतून कबूतर काढले माझे मत यालाच. त्यावेळी आपल्या लक्षात आले नाही कबूतर उडून गेले आणि टोपी आपल्याला घातली. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचाच प्रकार आहे, असा सणसणीत टोलाच उद्धव ठाकरेंनी लगावला.

- Advertisement -

आता या अर्थसंकल्पात अमुकतमुक घोषणा करतील. फुकटात गॅस सिलिंडरही देतील. पण निवडणूक झाली की त्याची किंमत दुपटीने तिप्पटीने वाढवतील. तरुणांना नोकऱ्या देणार हे तर आम्ही दहा वर्षे ऐकतो आहोत. आम्हाला तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही. आता या सरकारला गाडायची गरज आहे. गाडायचे असेल तर आधी खड्डा खणावा लागेल, त्यात गाडून त्यावर मतांची माती टाकावी लागेल तर ते गाडले जातील. खड्डा खणण्यासाठी तुम्हाला घराघरांमध्ये जावे लागेल आणि सरकारच्या योजनांना किती उपयोग मिळाला, किती फायदा झाला हे जाऊन विचारावे लागेल, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -