Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी वाराणसीच्या धर्तीवर नाशकात होणार गोदावरीची महाआरती, केंद्राकडून 5 कोटींची तरतूद

वाराणसीच्या धर्तीवर नाशकात होणार गोदावरीची महाआरती, केंद्राकडून 5 कोटींची तरतूद

Subscribe

अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर आता नाशिकच्या गोदावरी नदीची देखील रोज महाआरती होणार आहे. केंद्र सरकारकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गंगा नदीची पवित्र नदी म्हणून ओळख आहे. या नदीला मोठं धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचप्रमाणे गोदावरीला देखील दक्षिणगंगा म्हटलं जातं. गोदावरी नदीही गंगा नदीप्रमाणेच धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली एक महत्त्वाची नदी आहे.

पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अखेर गोदावरी नदीवर महाआरती करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा देखील भरत असतो आणि याठिकाणी देशभरातील भाविक आणि अनेक नागरिक अस्ती विसर्जनासाठी येत असतात. गोदावरी नदीला अनन्य साधारण महत्व देखील प्राप्त आहे.

- Advertisement -

या महाआरतीसाठी सरकारकडून 5 कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या संदर्भात आराखडा तयार करून आरतीला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. गंगा आरती पाहण्यासाठी संपूर्ण भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं येतात. पर्यटकांसाठीही ही आरती एक आकर्षणाचा विषय आहे.


हेही वाचा : पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, मनसेचा चित्रपट निर्मात्यांना इशारा


- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -