घरमहाराष्ट्रModi Govt : वानखेडे आणि शिंदेंबाबत कायद्याचे दुहेरी मापदंड का? ठाकरे गटाचा...

Modi Govt : वानखेडे आणि शिंदेंबाबत कायद्याचे दुहेरी मापदंड का? ठाकरे गटाचा थेट सवाल

Subscribe

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मनी लॉण्डरिंगचे गुन्हे दाखल आहेत. तर, भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील व्यवहाराप्रकरणी देखील ईडीने मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी बोलवायला हवे. वानखेडे-शाहरुखप्रकरणी ‘लाच’ मागितली आहे, तर शिंदे-गायकवाड प्रकरणात पैसे स्वीकारले आहेत आणि पैसे देणारा ‘आत’ आहे. ही केस पुराव्यासह मजबूत आहे. मग वानखेडे आणि शिंदेंबाबत कायद्याचे दुहेरी मापदंड का? असा थेट सवाल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : काँग्रेस पुन्हा नव्याने उभारी घेईल – विजय वडेट्टीवार

- Advertisement -

लाचलुचपत आणि वसुली, खंडणीखोरीचे हे प्रकरण आहे. त्यामुळे कायद्याने काय ती कारवाई होईल. या प्रकरणात शाहरुखकडून 25 कोटी मागितले असा आरोप आहे आणि त्यावर ‘ईडी’ने मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला. कायद्याचाच विचार करायचा तर मग वानखेडे यांच्यापेक्षा गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केस अधिक गंभीर मानायला हवी, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातली अग्रलेखात म्हटले आहे.

आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यावर ‘स्टेटमेंट’ दिले, ‘‘एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये पडले आहेत.’’ आता हे कोट्यवधी रुपये का पडले आहेत याचा तपास करायचा तर ‘ईडी’ने ‘शिंदे-गायकवाड’ यांच्यावर वानखेडे यांच्याप्रमाणे मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी बोलवायला हवे. शिंदे यांच्या सर्वच निवासस्थानी व ठिकाणांवर छापेमारी करून गुन्हेगारीतून निर्माण झालेल्या या कोट्यवधींच्या रकमेचा शोध घेतला पाहिजे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ED Raid Teckchandani : बिल्डर टेकचंदानीच्या घरावर ईडीची छापेमारी; कोट्यवधीची रोकड जप्त

हा काळा पैसा आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी काळा पैसा खोदून काढू व गुन्हेगारांना तुरुंगात टाकू असे जाहीर केले आहे. मग ‘ईडी’ याप्रकरणी हात चोळत का बसली आहे? शिंदे यांनी भाजपची गुलामी पत्करल्याने पैसे स्वीकारून ते मोकळे आणि वानखेडेंवर मात्र कारवाई! हा कोणता कायदा? ही कसली न्यायाची रीत? पण भाजपाच्या वॉशिंग मशीनची ही कमाल आहे, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्यामागेही ‘ईडी’चा ससेमिरा सुरूच आहे, पण वायकर यांच्यासमोर भाजपा किंवा मिंधे गटात जाण्याचा पर्याय ‘ईडी’ने ठेवला. कारवाईस सामोरे जा, नाहीतर पक्षांतर करा, असा हा सौदा चालला आहे. पण वायकर हे खंबीर व ठाम आहेत. आता विषय राहिला वानखेडे व शिंदे यांचा. समीर वानखेडे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरचे आरोप सारखे, पण कारवायांत भेदाभेद आहे. मग कायदे बनवताच कशाला? गुन्हा सारखाच, पण एकास फाशी व दुसऱ्याची साधी चौकशीदेखील नाही. मग कायदा हवा कशाला? असा बोचरा सवालही ठाकरे गटाने विचारला आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘इंडिया’ला धक्के; यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच काँग्रेसला गळती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -