Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कर्नाटक निवडणूक ; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदी-प्रियंका यांच्यात जुंपली

कर्नाटक निवडणूक ; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदी-प्रियंका यांच्यात जुंपली

Subscribe

कर्नाटकः कर्नाटक प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे. सुट्टीचा दिवस बघून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा कर्नाटकात झाल्या. या दोन्ही दिग्गज नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्यात कसलीच कसर सोडली नाही. कॉंग्रेस देश तोडायला निघाला आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला, तर मोदी हे विकास विसरलेत, असा टोला प्रियंका गांधी यांनी हाणला.

भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण हेच ज्या पक्षाचे ध्येय आहे, ती काँग्रेस कर्नाटकचा विकास करू शकेल का? 85 टक्के कमिशन खाणारी काँग्रेस कर्नाटकातील तरुणांचे भविष्य घडवू शकते का? असे सवाल पंतप्रधान मोदी यांनी केले. काँग्रेसने येत्या पाच वर्षांत खासगी क्षेत्रात 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच, दरवर्षी दोन लाख नोकऱ्या! भाजपा सरकारने कर्नाटकात साडेतीन वर्षे राज्य केले आणि दरवर्षी 13 लाखांहून अधिक औपचारिक नोकऱ्या निर्माण केल्या. याचा अर्थ, काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्नाटकला रिव्हर्स गियरमध्ये टाकेल. जनतेने काँग्रेस पक्षाबाबत सावध राहावे, असे आवाहनही मोदींनी केले.

- Advertisement -

काँग्रेसच्या काही दशकांच्या राजवटीत मुलींचे शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाकडे दुर्लक्षित केले गेले. भाजपने मुलींवरील अन्याय दूर करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आज अधिकाधिक मुली शाळेत जात आहेत, असा दावा पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला प्रियंका गांधी उत्तर दिले. कर्नाटकात हिंसाचार वाढत असेल तर तो फक्त बेरोजगारी आणि 40% कमिशन सरकारमुळे वाढत आहे. यापूर्वी 4 वेगवेगळ्या बँका होत्या. कॉर्पोरेशन बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँक आणि आता या सरकारमुळे या सर्व बँका एका बँकेत विलीन झाल्या आहेत, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

- Advertisement -

मी स्वप्न पाहिलं होतं, असं मोदी सकाळी म्हणत होते. मी कर्नाटकला देशातील सर्वात विकसित राज्य बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. तुम्ही स्वप्न पाहिले, तूम्ही सर्वज्ञानी, अंतर्यामी आहात. तुमचे स्वप्न भंग करण्याची हिंमत कोणात होती? मी सांगते तुम्हाला, तुमच्याच भाजप सरकारने तुमचे स्वप्न भंग केले आणि कर्नाटकला लुटले, असं म्हणत प्रियंका गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला.

- Advertisment -