घरमहाराष्ट्रSanjay Raut : "मोदी-शहा महाराष्ट्राचे गुन्हेगार" संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut : “मोदी-शहा महाराष्ट्राचे गुन्हेगार” संजय राऊतांची घणाघाती टीका

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात वाढत असलेली गुन्हेगारी हे नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश आहे. त्यांनी हे माफियाराज महाराष्ट्रावर लादले आहे. मोदी आणि शहा यांनी हा महाराष्ट्रावर उगवलेला सूड आहे, असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अभिषेक घोसाळकर प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) रात्री हत्या करण्यात आले. दहिसर-बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले मॉरिस नोरोन्हा यांनी फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच घोसाळकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. पण धक्कादायक बाब मॉरिसने यानंतर गोळ्या झाडून आत्महत्या केली. (“Modi-Shah criminals of Maharashtra” Sanjay Raut’s harsh criticism)

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : “हिंमत असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करा”, घोसाळकरांच्या हत्येनंतर राऊतांचे आव्हान

या प्रकरणी संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात वाढत असलेली गुन्हेगारी हे अपयश नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश आहे. त्यांनी हे माफियाराज महाराष्ट्रावर लादले आहे. मोदी आणि शहा यांनी हा महाराष्ट्रावर उगवलेला सूड आहे. हे अपयश घटनाबाह्य मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मोदी-शहा यांचे आहे. मोदी आणि शहा हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. महाराष्ट्रात रोज पडणारे रक्ताचे सडे आणि गुन्हेगारी वाढण्यासाठी तेच जबाबदार आहेत. त्यांनीच हे माफियाराज महाराष्ट्रावर लादले आहे. मग आता ते काय करत आहेत, असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या इतिहासातील अकार्यक्षम आणि अपयशी गृहमंत्री असे म्हणत म्हटले की, अभिषेक घोसाळकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. राज्यातील गुंडांचा हा नंगानाच अस्वस्थता निर्माण करणार आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. रोज गुंडगिरीच्या घटना समोर येत आहेत. अशावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? गृहमंत्री अदृश्य आहेत. अशा परिस्थितीत गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे? गृहमंत्री विदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत ‘चाय पे चर्चा’ करत फिरत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

तसेच, महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची चर्चा कोण करणार? अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम आणि अपयशी गृहमंत्री असल्याचे सिद्ध झाले आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद हे फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकायला आणि भाजपची भूमिका मांडण्यासाठी दिले आहे, अशी घणाघाती टीकाही संजय राऊत यांनी केली. तर, एकनाथ शिंदे हे सरकारी पैशाने गुंड आणि माफियांना बळ देण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -