घरताज्या घडामोडीपुण्यात उभारली पंतप्रधानांची २ फुटांची मूर्ती, सेल्फी घेण्यासाठी मोदी भक्तांची गर्दी

पुण्यात उभारली पंतप्रधानांची २ फुटांची मूर्ती, सेल्फी घेण्यासाठी मोदी भक्तांची गर्दी

Subscribe

मोदींची ही मूर्ती पाहण्यासाठी नमो भक्तांची गर्दी होत असून मोदींच्या मूर्तीसोबत सेल्फी घेण्याचा मोह मोदी भक्तांना आवरत नाहीये.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत मोदींवर अनेक स्तरातून टीका होत आहे. मात्र मोदींचे जितके विरोधक आहेत तितकेच मोदी भक्तही काही कमी नाहीत. अशाच एका मोदी भक्ताने पुण्यात चक्क पंतप्रधान मोदींची मूर्ती (Prime minister narendra modi idol) उभारली आहे.  पुण्याच्या औंध येथे पंतप्रधानांना चक्क देवाचा दर्जा देत त्यांचे छोटेखानी मंदिर तयार करुन मोदींची २ फुटांची मूर्ती त्यात बसवण्यात आली आहे. ( Modi Temple in pune bjp activist build 2 Feet Prime minister narendra modi idol) १५ ऑगस्टला ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. नमो (Namo) फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेले पंतप्रधानांचे हे मंदिर सध्या पुण्यात चर्चेचा विषय बनला आहे. पुण्यातील भाजपचे कार्यकर्ते असलेल्या मयूर मुंढे (Mayur Mundhe) यांनी मोदींचे हे मंदिर बांधले आहे. सध्या मोदींची ही मूर्ती पाहण्यासाठी नमो भक्तांची गर्दी होत असून मोदींच्या मूर्तीसोबत सेल्फी घेण्याचा मोह मोदी भक्तांना आवरत नाहीये.

नमो मंदिरच नाही तर मयूर मुंढे यांनी पंतप्रधानांवर तयार केलेली कविता देखील आकर्षणाचा विषय ठरली आहे. ‘विरोधकांनी ट्रोल केले तरी चालेल पण मला मोदींकडून प्रेरण मिळते’, असे म्हणत मयूर यांनी मोदींवर केलेल्या कविता मंदिराच्या बाहेर लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोदींच्या कामांचा उल्लेख करणारे फलक देखील तिथे मांडण्यात आले आहेत.

- Advertisement -

पुण्याच्या ओंध येथे राहणाऱ्या मयूर मुंढे यांनी पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांच्याकडून खास जयपूर येथून मोदींची २ फुटांची १ लाख ६० हजार रुपयांची मूर्ती तयार करुन घेतली. १५ ऑगस्टपासून पुण्यातील अनेक जण नमो मंदिरात फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत.


हेही वाचा – ‘या’ महिन्यात मिळणार PM Kisanचा पुढील हप्ता; जाणून घ्या PM Modi कधी करणार घोषणा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -