घरCORONA UPDATECoronaVirus : कोरोनाविरूद्धच्या युद्धात मोदी जगात अव्वल; अमेरिकन संस्थेने केले मूल्यांकन

CoronaVirus : कोरोनाविरूद्धच्या युद्धात मोदी जगात अव्वल; अमेरिकन संस्थेने केले मूल्यांकन

Subscribe

अमेरिकन डेटा संशोधक कंपनीने तर या युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगात पहिला क्रमांक दिला आहे.

जागतिक कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात, सर्व देश आपापल्या स्तरांवर लढत आहेत. कोरोना विषाणूविरूद्ध युद्धात भारतही संघर्ष करत आहे, यात जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताचे कौतुक केले आहे. अमेरिकन डेटा संशोधक कंपनीने तर या युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगात पहिला क्रमांक दिला आहे. या कंपनीने जगातील पहिल्या दहा प्रभावी नेत्यांचे मूल्यांकन केले. या कंपनीने कोरोनाचा अमेरिकावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास केला. या तुलनात्मक संशोधनात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह जगातील अन्य ९ प्रमुख देशांच्या प्रमुखांचे मूल्यांकन करण्यात आले. या संशोधनात कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी कोणता देश व त्याचा नेता कार्यरत आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या कंपनीच्या अहवालानुसार, जगातील पहिल्या १० देशांच्या प्रमुखांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर असल्याचे आढळले आहे. या यादीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आठव्या क्रमांकावर आहेत तर ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन तिसर्‍या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट या संशोधक कंपनीने १ जानेवारी २०२० ते १४ एप्रिल २०२० या कालावधीत मूल्यांकन केले.

- Advertisement -

कोण आहेत या यादीत

या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो, जर्मनीचे चांसलर अँजेला मर्केल, ब्राझीलचे अध्यक्ष झैरे बोल्सनारो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -