घरCORONA UPDATEमोदींच्या ९ मिनिटांच्या चॅलेंजमुळे देशाचे विजेचे ग्रीड धोक्यात?

मोदींच्या ९ मिनिटांच्या चॅलेंजमुळे देशाचे विजेचे ग्रीड धोक्यात?

Subscribe

मला तुमची ९ मिनिटे हवी आहेत, आपआपल्या घरातले दिवे बंद करा आणि दिवे, मेणबत्त्या लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

मला तुमची ९ मिनिटे हवी आहेत, आपआपल्या घरातले दिवे बंद करा आणि दिवे, मेणबत्त्या लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी देशवासीयांना ९ मिनिटांचे चॅलेंज देत संपुर्ण देशातील विजेचे ग्रीड आता हाय रिस्कला टाकले आहे, असे ऊर्जा क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. सलग ९ मिनिटे देशातली वीज बंद करून आपण देशातले विजेचे क्षेत्र संकटात टाकत आहोत, अशी प्रतिक्रिया आता ऊर्जा क्षेत्रातून समोर येऊ लागली आहे.

देशातली सध्याची विजेची गरज ही १ लाख ४० हजार मेगावॉट आहे. पण एकाचवेळी देशातले विजेचे दिवे बंद करणे म्हणजे प्रत्येक राज्यातील तसेच देशातील ग्रीडला धोका पोहचवण्याची ही रिस्क आहे. देशातला प्रकाशासाठीच्या विजेच्या दिव्यांचा वापर हा साधारणपणे २० हजार मेगावॉट आहे. एकाचवेळी इतकी वीज यंत्रणेतून न वापरणे हे तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानाचे आहे. कारण ९ मिनिटे संपल्यानंतर हे दिवे पुन्हा वापरात येतील. त्यामुळे विजेच्या यंत्रणेत पुन्हा एकदा विजेच्या दिव्यांसाठी विजेची गरज वाढेल. त्यासाठीच आता येत्या दोन दिवसात प्रत्येक राज्यातील लोड डिस्पॅच सेंटर कामाला लागले आहेत. ९ मिनिटांच्या कालावधीत विजेची ग्रीड कशी स्थिर ठेवता येईल यासाठीची आता स्टेट लोड डिस्पॅच सेंटरची टीम कामाला लागली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांची विजेची मागणी ही आता १३ हजार मेगावॉटवर खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही आता ९ मिनिटांच्या चॅलेंजसाठी मोठी तयारी सुरू झाली आहे. देशात सर्वाधिक विजेची मागणी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात यासारख्या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे वेस्टर्न रिजनच्या ग्रीडवर अतिशय मोठे आव्हान आहे. कारण मोठ्या विजेची मागणी असणारी राज्ये एकाचवेळी ९ मिनिटांसाठी विजेचे दिवे बंद करणार आहेत. त्यामुळे आता या ९ मिनिटांच्या काळात विजेच्या ग्रीडचे कसे व्यवस्थापन होणार यासाठी स्टेट लोड डिस्पॅच सेंटरची तारेवरचीच कसरत होणार आहे.

वीज क्षेत्रातील तज्ञांच्या मते ९ मिनिटांचे चॅलेंज हे आव्हानात्मक नसेल असाही अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे. देशात विजेच्या दिव्यांना बंद केल्याने मागणी ही २० हजार मेगावॉटने कमी होईल. या काळात प्रत्येक राज्यात बेस लोड म्हणजे काही स्थिर असे विजेचे स्त्रोत असणारे कोणते पर्याय वापरले जातील यावर सगळी वेळ मारून नेता येईल असे काही जणांचे मत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात उपलब्ध असणारा जलविद्युत प्रकल्पांचा पर्याय तसेच गॅसवर आधारीत प्रकल्पांमुळे ही वेळ मारून नेता येईल. त्याअनुषंगानेच सध्या नियोजन सुरू झाले आहे अशी माहिती ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रतिनिधी अशोक पेंडसे यांनी दिली. याआधीही देशात जेव्हा सुर्य ग्रहण होते तेव्हा एकाएकी विजेची मागणी काही ठराविक कालावधीसाठी वाढली होती. पण त्यासाठीचे नियोजन झाल्यानेच या काळात विजेच्या ग्रीडवर कोणतेही संकट निर्माण झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

देशात मोठ्या प्रमाणात आता एलईडी लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. एकुण विजेच्या मागणीच्या तुलनेत विजेच्या दिव्यांची असणारी मागणी ही २० टक्के असेल. या कालावधीत नियमित घरांमध्ये चालणारी पंखा, रेफ्रिजेरेटर अशी उपकरणे चालूच राहणार आहेत. त्यामुळेच विजेच्या दिव्यांचा मोठा परिणाम हा विजेच्या ग्रीडवर होणार नाही. तुलनेत हे चॅलेंज स्टेट लोड डिस्पॅच सेंटरकडून व्यवस्थित हाताळण्यात येईल अशी माहिती एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हीसेस लिमिटेडचे महाराष्ट्रातील व्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी दिली.

देशातील विजेची मागणी १ लाख ४० हजार मेगावॉट
महाराष्ट्रातील विजेची मागणी १३ हजार
देशातली विजेच्या दिव्यांची मागणी २० हजार मेगावॉट
सर्वाधिक वीज वापरणारी राज्ये – महाराष्ट्र, गुजरात
महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांची क्षमता २५८० मेगावॉट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -