घरदेश-विदेशमोदींची ‘ती’ मुलाखत म्हणजे प्रतिमा संवर्धनाचा विनोदी प्रकार!

मोदींची ‘ती’ मुलाखत म्हणजे प्रतिमा संवर्धनाचा विनोदी प्रकार!

Subscribe

प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आपले काम करीत असल्याची शेखी मिरवणार्‍या रा.स्वं. संघाचे स्वयंसेवक नरेंद्र मोदी यांचा प्रसिद्धीचा निदिध्यास हा आश्चर्यकारक आहे. बुधवारी दिवसभर दूरदर्शनच्या कृपेने विविध वाहिन्यांवर दाखविल्या गेलेल्या सिनेनट अक्षय कुमारने घेतलेल्या मोदी यांच्या मुलाखतीने हे सिद्ध झाले आहे. ज्यांच्या भाषणांमध्ये राजकारण सोडून एकही वाक्य नसते अशा मोदींची तथाकथित अराजकीय मुलाखत ऐन निवडणुकीच्या काळात प्रसारित करण्याचे अन्यथा काय कारण होते?, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी उपस्थित केला आहे.

नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना डॉ. महाजन म्हणाले की, एका बाजूला निवडणूक आयोगाने त्यांच्यावरील चरित्रपटाच्या प्रसारणाला बंदी घातल्याने ही क्लुप्ती योजिली आहे, तर दुसर्‍या बाजूने मोदी यांच्या प्रतिमा संवर्धनाचा हा एक अत्यंत विनोदी प्रकार होता. निवडणुकीच्या अजून तीन फेर्‍या बाकी असताना सरकारी प्रसारमाध्यमावरून अशी मुलाखत प्रसिद्ध करणे हा कदाचित तांत्रिकदृष्ठ्या आचारसंहितेचा भंग नसेल पण आपल्या नसलेल्या प्रतिमा निर्मितीचा हा अश्लाघ्य प्रयत्न व त्याद्वारे लोकांवर भुरळ पाडण्याचा प्रकार नक्की होता, अशी टीका डॉ. महाजन यांनी केली आहे.

- Advertisement -

गुजरातचा मुख्यमंत्री होईपर्यंत ते स्वतःचे कपडे स्वतःच धूत होते हा त्यांचा दावाही खोटाच आहे. मोदी मुख्यमंत्री होण्याआधी संघाचे प्रचारक होते. त्यावेळी त्यांच्याकडे चांद मोहम्मद नावाचा धोबी कामाला होता, या धोब्याचे निधन २३ ऑक्टोबर २०१७ रोजी झाले. त्यामुळे मोदींचा खोटारडेपणा यातून स्पष्ट होतो. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांबद्दलचा दावाही हास्यास्पद आहे. ओबामा माझ्याशी अरेतुरेच्या भाषेत बोलायचे असे मोदींनी म्हटले आहे, पण इंग्रजीमध्ये अरेतुरे कसे काय बोलू शकतात आणि हिंदीत बोलण्याची सोय असली तरी ओबामांना हिंदी येत नाही.

तसेच इंग्रजीतील How are you चे how are तू, कसे काय होते हेही आश्चर्यच आहे. या मुलाखतीत नेहमीप्रमाणे मोदी यांनी अनेक बालिश, विनोदी व असत्य विधाने केली. त्या विधानांची खातरजमा करण्याचे कोणतेही साधन लोकांजवळ नसल्याचा फायदा घेऊन त्यांनी अनेक मनोरंजक किस्से ऐकवले, असे डॉ. महाजन म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -