घरताज्या घडामोडीहिंदू मुस्लिमांचे पूर्वज एकच, RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

हिंदू मुस्लिमांचे पूर्वज एकच, RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांशी संबंधित एक मोठ विधान केले आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज हे एकच होते आणि ते भारतीय हिंदू असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. पुण्यात ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनद्वारा आयोजित एक कार्यक्रमात त्यांनी सांगितले समजुतदार मुस्लिम नेत्यांनी धर्मांध शक्तींविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. भारतात अल्पसंख्यांक समुदायाला कोणत्याही गोष्टीशी घाबरण्याची गरज नाही. कारण मुळातच हिंदू कोणाशी शत्रूत्व ठेवत नाहीत. हिंदू शब्द मातृभूमि, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीत एकसमान आहे. त्यामुळे हा विचारांचा अपमान नव्हे, असेही ते म्हणाले. (RSS chief Mohan bhagwat says hindu and muslims share same ancestry )

आपल्याला मुस्लिमांचा वर्चस्वाच्या विचाराएवजी भारतीयांच्या वर्चस्वाचा विचार करणे गरजेचे असल्याचेही मोहन भागवत यांनी सांगितले. भारताच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. इस्लाम आक्रांतासह भारतात आला आहे. हा इतिहास आहे आणि त्याच स्वरूपात सांगितला जाणे गरजेचे आहे. समजुतदार मुस्लिम नेत्यांना अनावश्यक मुद्द्यांना विरोध करणे गरजेचे आहे. त्यासोबतच धर्मांध आणि अतिरेकी शक्तींविरोधात एकत्र उभे राहण्याचीही गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. जितक्या लवकर आपण या गोष्टी करू तितकेच कमी नुकसान होईल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आमच्यासाठी प्रत्येक भारतीय हिंदू

भारत महाशक्ती म्हणून कोणालाही भीती दाखवणार नाही. हिंदू शब्द हा आपल्या मातृभूमी, पूर्वज आणि संस्कृतीच्या समृद्ध अशा वारशाचे देणे आहे. त्यामुळेच आमच्यासाठी प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे. त्यामुळे त्याचा धर्म, भाषा आणि वंश काहीही असो. भारतीय संस्कृती मूळातच विविध विचारांना समायोजित करते. त्यामुळे इतर धर्मांचा सन्मान या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून होतो असाही दावा त्यांनी केला.


हेही वाचा – देशातील मुस्लिमांचं सीएएमुळे कोणतंही नुकसान होणार नाही, मोहन भागवत यांचे वक्तव्य

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -