घरताज्या घडामोडीNawab Malik ED enquiry: ईडीकडून मलिकांची पाच तासांपासून चौकशी सुरू; मोहित कंबोज...

Nawab Malik ED enquiry: ईडीकडून मलिकांची पाच तासांपासून चौकशी सुरू; मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरू आहे. माहितीनुसार आज पहाटे पाच ईडीचे पथक नवाब मलिकांच्या घरी पोहोचले आणि मग त्यांना ईडी कार्यालयात घेऊ गेले. गेल्या पाच तासांपासून नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मलिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेर सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर मोहित कंबोज यांनी सूचक ट्वीट करत आहे.

नवाब मलिक ईडीची चौकशी करत असल्याचे समोर आल्यानंतर मोहित कंबोज यांनी ‘जय श्री राम’ असे ट्वीट केले. त्यानंतर त्यांनी असे ट्वीट केले की, ‘सकाळी ५ वाजता उचलून घेऊन नेले जाते, माणूस स्वतः जात नाही.’

- Advertisement -

- Advertisement -

या दोन ट्वीटनंतर मोहित कंबोज यांनी एका डब्ब्याचा फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका वाघ हरणाची शिकार करून घेऊ जात असल्याचे दिसत आहे.

नेमके प्रकरण काय? 

दरम्यान काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मुंबईत आणि लगतच्या परिसरात छापेमारी केली होती. दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या घरीदेखील ईडीने छापा टाकला होता. या छापेमारी दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील नेतेमंडळी ईडीच्या रडारवर असल्याचे समोर आले होते. या छापेमारीत दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान इब्राहिम कासकरने नवाब मलिकाचे नाव घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज ईडी नवाब मलिकांची चौकशी करत आहे.


हेही वाचा – Nawab Malik ED enquiry: सुडबुद्धीची कारवाई ही पक्षश्रेष्ठींना वाटणे साहजिकच, पवारांच्या प्रतिक्रियेनंतर दरेकरांची टोलेबाजी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -