मोहित कंबोज यांचे नवे ट्वीट, ‘गबरू’ जवान म्हणत केला बारामती ॲग्रोचा उल्लेख

Mohit Kamboj

मुंबई – भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी ग्रीन एकर्स रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा 200 वेगवेगळे स्टार्ट अप्स करणाऱ्या ‘गबरू जवान’ ची गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड करा म्हटले आहे. दरम्यान या अगोदरच्या ट्वीटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार, असेही ट्वीटमध्ये म्हटले होते.

ट्वीटमध्ये काय? –

भारताच्या #JeffBezos ला भेटा – 2006 मध्ये, या 21 वर्षीय गब्रू जवानाने रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 200 विविध प्रकारच्या प्लास्टिक, हिरे, सोने, बिल्डर, निर्यात, आयात, मद्य ते ट्रंकचा व्यवसाय सुरू केला. गिनीज बुकला विनंती केली. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव कोरले, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

त्यांनी दुसऱ्या ट्वीटमधेय गब्रू जवानाचे या बिझनेस मॅाडेलमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे 2007 ते 2012 पर्यंत 1000 कोटींचे नुकसान झाले. या बँकेने साखर कारखान्याला कोट्यवधींचे कर्ज दिले. साखर कारखान्याने पैसे दाबले, त्यानंतर 2012 मध्ये साखर कारखान्याचा लिलाव झाला आणि गब्रू जवानाच्या बारामती अॅग्रोने कार्टेल बनवून साखर कारखा केवळ 50 कोटींना विकत घेतले, असेही ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पुढे त्यांनी कारखान्याने परत 150 कोटी रूपयांच कर्ज घेतले. HDIL- PMC बँक आणि पत्रा चाळ घोटाळ्यात गबरू जवानाने किती साखर खाल्ली आहे हे ही लवकरच कळेल, असे म्हणत  मोहत कंबोज यांचा ट्विटरवरून टीका केली. मोहित कंबोज यांच्या ट्वीटच्या मालिकेमुळे ग्रीन एकर्स रिसॅार्ट चौकशी होणार का?, असा प्रश्न उपस्थित राजकी वर्तुळात उपस्थित झाला आहे.