संजय राऊत यांच्याअटकेनंतर मोहीत कंबोज यांचे सूचक ट्वीट, म्हणाले…

MOHIT KAMBOJ

पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना रविवारी सकाळी 7 वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी भांडूप येथील घरी छापा टाकला. यानंतर त्यांची 17 तास चौकशी करून संजय राऊत यांना अटक केली. यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये काय? –

या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊत यांना अटक. नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत. आता पुढचं कोण?, असे ट्वीट मोहित कंबोज यांनी केले आहे. यासोबत त्यांनी सलीम जावेद यांची भेट झाली असेही म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी सलिम जावेद यांची जोडी गजाआड करणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

मोहित कंबोज आणि अस्लम शेख यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट –

रात्री मोहित कंबोज आणि अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीपूर्वीचा व्हिडीओही समोर आला होता. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर नाही तर माझा वाढदिवस होता म्हणून मी भेटलो असल्याचेही त्यांनी सांगितले.