Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र त्यांनी मला खूप मारलं... त्यांना सोडू नका

त्यांनी मला खूप मारलं… त्यांना सोडू नका

मला त्यांनी खूप मारलं, मला खूप त्रास होतोय, त्यांना सोडू नका, असं शुद्धीवर आलेल्या नागपूरच्या दामिनीचे पहिले उद्गार आहेत. १४ ऑगस्ट रोजी दामिनीवर अत्याचार झाला होता.

Related Story

- Advertisement -

मला त्यांनी खूप मारलं, मला खूप त्रास होतोय, त्यांना सोडू नका, असं शुद्धीवर आलेल्या नागपूरच्या दामिनीचे पहिले उद्गार आहेत. १४ ऑगस्ट रोजी दामिनीवर अत्याचार झाला होता. तेव्हापासून ती बेशुद्ध होती. पोलिसांसमोर दामिनी शुद्धीवर आली असता तिने हे उद्गार काढले. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्यांची मने हेलावली. आयसीयूतून दामिनीला आता सामान्य वॉर्डात नेण्यात आले असून तिची प्रकृती ठीक असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या मानसिक धक्क्यातून ती अजून सावरलेली नाही. नागपूरच्या सीटी हॉस्पीटलमध्ये दामिनीवर उपचार सुरू आहेत.

अत्याचार करणार्‍या आरोपींपैकी एका आरोपीला ती ओळखू शकते असंही तिने सांगितलं. दोन आठवड्यांपूर्वी चार नराधमांनी ’दामिनी’वर बलात्काराचा प्रयत्न करून तिला गंभीररित्या जखमी केलं होतं. उमरेड तालुक्यातील वेस्टर्न कोल्फिल्ड्स लिमिटेडजवळच्या गोकुळ कोळसा खाणीत ही घटना घडली होती.  याठिकाणी महिलांना लघुशंकेसाठी योग्य जागा नसल्यामुळे पिडित तरुणी लघुशंकेसाठी परिसरातील झुडुपात गेली. त्यावेळी कोळसा खाणीत आलेल्या चार ट्रक चालकांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे त्यांनी तरुणीच्या डोक्यात दगड मारून तिला गंभीर जखमी केले.


पाळणा घरात चिमुकल्यांना ठेवत आहात सावधान!

- Advertisement -

पुणे । पुण्यात एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांना 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रमाणात आई-वडिल नोकरी करण्यासाठी दिवसभर घराच्या बाहेर असतात. त्यामुळे त्यांना आपल्या चिमुकल्यांना पाळणा घरात ठेवावे लागते. मात्र आपण आपल्या मुलांना ज्यांच्यावर विश्वास ठेवून पाळणा घरात ठेवतो. ती आपली मुलं खरचं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडतो. अनेक ठिकाणाच्या घटना ऐकून चिमुकले सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. आपल्या चिमुकल्यांना पाळणा घरात ठेवत असाल तर सावधान! कारण पुन्हा एकदा पाळणा घरात ठेवल्या जाणार्‍या चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याची पुनरावृत्ती पुण्यात झाल्याची पाहायला मिळाली.

पुण्यात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

पुण्यातील कोथरुड परिसरातील एका पाळणा घरात ठेवलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पाळणाघर चालवणार्‍या मालकीणीच्या मुलांनी आणि त्याच्या मित्राने चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपींना 4 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय घडले नेमके त्या दिवशी

- Advertisement -

आई – वडिल दोघेही नोकरी करणारे असल्याने मुलीला कुठे ठेवणार असा प्रश्न पालकांना पडला. त्यांनी जवळच्या कोथरुड परिसरातील एका पाळणा घरात आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला ठेवले. मात्र ती चिमुरडी सुरक्षित नसल्याचे समोर आले. पाळणा घरातील मालकीणीचा १7 वर्षाचा मुलगा आणि त्याचा मित्र गेल्या काही दिवसांपासून या मुलीवर अत्याचार करत होते. अचानक ही चिमुकली घरी गेल्यानंतर कपडे काढून झोपत होती. हा विचित्र प्रकार तिच्या आई – वडिलांच्या लक्षात आला. याबाबत चिमुकलीकडे चौकशी केल्यास पाळणाघरातील दादानेच असे करायला सांगितले असल्याचे ती मुलगी म्हणाली. त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. चिमुकलीच्या आई – वडिलांनी तात्काळ धाव घेत कोथरुड पोलिसात तक्रार करत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या दोघांना 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -