घरताज्या घडामोडीपुष्पाचा फ्लॉवर डायलॉग मारून भाईगिरी करणाऱ्या गुंडाला, भरचौकातच महिला पोलिसांनी दाखवली फायर

पुष्पाचा फ्लॉवर डायलॉग मारून भाईगिरी करणाऱ्या गुंडाला, भरचौकातच महिला पोलिसांनी दाखवली फायर

Subscribe

रिल्स, फेसबुकवर देखील हा डायलॉग सतत ट्रेंडमध्ये असतो. अनेक जण दुसऱ्याला इंप्रेस करण्यासाठी हा  डॉयलॉग हमखास मारतात. परंतु पुष्पाचा फ्लॉवर डायलॉग मारुन भाईगिरी करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी चांगलाच फायर दाखवला आहे.

पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या ? मै फ्लॉवर नही फायर हूँ, पुष्पा सिनेमातील हा डॉयलॉग सध्या चांगलाच प्रसिद्ध झालाय. जिथे जाऊ तिथं हा डायलॉग ऐकायला मिळतो. रिल्स, फेसबुकवर देखील हा डायलॉग सतत ट्रेंडमध्ये असतो. अनेक जण दुसऱ्याला इंप्रेस करण्यासाठी हा  डॉयलॉग हमखास मारतात. परंतु पुष्पाचा फ्लॉवर डायलॉग मारुन भाईगिरी करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी चांगलाच फायर दाखवला आहे. भरचौकात हा भाईची महिला पोलिसांकडून पुष्पा स्टाइलने वरात काढण्यात आली. सध्या लातूरमधील ही घटना सर्वांच्या चर्चेचा विषय बनली असून या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

लातूरमध्ये गौस मुस्तफा सय्यद नावाचा एक गुंड राहतो. जो स्वत:ला तिथला भाई समजतो. लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्याच्या परिसरात हा गौस रहायला असून गेल्या काही दिवसांपासून त्याने परिसरात दहशत निर्माण केलीय. अनेक नागरिकांवर त्या दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला. तसेच मुलींना पुष्पाचा डायलॉग मारुन त्यांना मारहाण देखील करत होता. मारहाण झालेल्या एका पीडित मुलीने गौसाच्या विरोधात विवेकानंद पोलीस स्थानकात तक्रार केली.

- Advertisement -

विवेकानंद पोलिसांनी गौसचा शोध घेण्यासाठी सापळा रचला आणि  पळून गेलेल्या गौसला ताब्यात घेतले.  पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर महिला पोलिसांनी गौसची चांगली धिंड काढत पुष्पा स्टाइलने भर चौकात रस्त्यावर फटके दिले. गौसा भाईला पाहण्यासाठी संपूर्ण परिसरात मोठी गर्दी देखील झाली होती.

या घटनेनंतर पोलिसांनी त्या भागातील नागरिकांना असा कोणताही प्रकार पुन्हा झाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे आणि त्या व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Pune Expressway: होळी सेलिब्रेशनसाठी विकेंडला लोणावळ्याला जाताय ? वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -