Homeमहाराष्ट्रनाशिकMoney Laundering : बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा गैरव्यवहार; ईडीचा खुलासा

Money Laundering : बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा गैरव्यवहार; ईडीचा खुलासा

Subscribe

नाशिकच्या मालेगाव येथील एका व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये 14 खाती उघडून त्यातील रकमेचा निवडणुकीसाठी गैरवापर केल्याच्या प्रकरणात आता ईडीच्या तपासाची व्याप्ती वाढल्याचे दिसून आले आहे.

नाशिक : नाशिकच्या मालेगाव येथील एका व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये 14 खाती उघडून त्यातील रकमेचा निवडणुकीसाठी गैरवापर केल्याच्या प्रकरणात आता ईडीच्या तपासाची व्याप्ती वाढल्याचे दिसून आले आहे. हा गैरव्यवहार 1200 कोटी रुपयांचा असल्याचा संशय असून बनावट कंपनीद्वारे 21 बँक खात्यामधून करण्यात आलेल्या 800 कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यापैकी अनेक कंपन्या एकाच मालकीच्या असून त्या नवी मुंबई, सुरत,अहमदाबाद, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील असल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे. (ED Investigation suspects money laundering case worth rs 120 crore.)

हेही वाचा : Mns Avinash Jadhav: मारहाण प्रकरणी अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

मालेगावमधील मर्चेंट बँकेच्या शाखेमध्ये बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हे पैसे व्होट जिहादसाठी वापरल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक अशा अनेक ठिकाणी चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे सध्या ईडीकडून सुरू असलेल्या तपासात या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे दिसून आले आहे. हा गैरव्यवहार 1200 कोटी रुपयांचा असल्याचा संशय असून बनावट कंपनीद्वारे 21 बँक खात्यांतून करण्यात आलेल्या 800 कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. तसेच या प्रकरणातील तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या सर्व कंपन्या या एकाच मालकीच्या असून त्या नवी मुंबई, सूरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या प्रकरणात राजकीय पक्ष किंवा कोणती व्यक्ती यांचा सहभाग आहे की नाही याचा देखील तपास ईडीकडून सुरू आहे.

हेही वाचा : Bacchu Kadu : भाजपाकडून शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न; बच्चू कडू स्पष्टच म्हणाले…

- Advertisement -

तपासामध्ये या बँक खात्यात गेल्या तीन ते चार महिन्यात 800 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या 14 बँक खात्यांमधूनही रक्कम काढण्यात आली असून ती रक्कम संबंधित ठिकाणी पोहोचवण्यासाठी हवाला रॅकेटचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


Edited By komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -