मंकीपॉक्स, गोवर ते रिर्टन कोरोना, २०२२ मध्ये राज्यात ‘या’ आजारांची धास्ती

Monkeypox, Measles Coronavirus Fear of These Diseases in the maharashtra in 2022

२०२२ वर्षाचा निरोप घेत नाही तोवर आता पुन्हा कोरोना हिज बॅक म्हणायची वेळ आली आहे. कारण चीन, अमेरिकासह जवळपास पाच देशांमध्ये पुन्हा कोरोना महामारीने थैमान घेतले आहे. त्यामुळे भारताने 2023 व्या वर्षात एन्ट्री घेण्याआधी कोरोनाची भारतातील एन्ट्री रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. मात्र सरते 2022 हे वर्ष केवळ कोरोनाचं नाही तर इतर आजारांमुळेही चर्चेत राहिले. २०२२ या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना महामारीची लाट भारतात कुठेतरी ओसरत होती. मात्र यात इतर अनेक आजार डोकं वार काढत राहिले. सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या आजारांनी तर लोकांना त्रास दिलाच. पण विशेषत: मंकीपॉक्स, गोवर, अशा अनेक आजारांचा नागरिकांना सामना करावा लागला. यात मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या आजारांचाही समावेश आहे. त्यामुळे 2022 मध्ये राज्याला वेठीस धरणारे हे आजार नेमके कोणते होते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

1) मंकीपॉक्स

2022 या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषाणू म्हणजे मंकीपॉक्स. या विषाणूने कोरोनानंतर थैमान माजवले होते. शारिरीक स्पर्शातून हा विषाणू वेगाने पसरतो. भारतात मंकीपॉक्सची पहिली केस मे महिन्यात आढळली होती. केरळात ३ आणि दिल्लीत १ असे मंकीपॉक्सचे ४ रुग्ण भारतात आढळले, मात्र अद्याप तरी राज्यात मंकीपॉक्स नाही.

2) गोवर

नोव्हेंबर 2022 मध्ये राज्यात लहान मुलांमध्ये गोवरची साथ पसरली. सुरुवातील मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिकसारख्या शहरांमध्ये गोवरचा उद्रेक झाला. त्यानंतर राज्याच्या विविध भागांत ही साथ पसरत गेली. २२ डिसेंबर २०२२ पर्यंत राज्यात गोवरचे ११०४ गोवरच्या केसेस आढळल्या तर 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. २०२२ मध्ये गोवर मृत्यूचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. यात मृतांमध्ये १२ ते १४ महिन्यांच्या बाळांचा समावेश आहे. गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे राज्य सरकारने गोवर रुबेला लसीकरण सुरु केले आहे.

3) साथीचे आजार वाढले

राज्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूच्या रुग्णांमुळे चिंता वाढत आहे. या आजारांच्या प्रमाणात सातत्याने चढ उतार होत आहेत. त्यामुळे कोरोनासह आता या साथीच्या आजारांचा सामना करण्याचे आवाहन आरोग्य व्यवस्थेसमोर आहे. यात मुंबई, ठाणे, पुण्यात या आजारांचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. राज्यात जुलै २०२२ मध्ये मलेरियाचे ३२२८ रुग्ण आढळे होते ते आता ९१६ पर्यंत घटले आहे. तर स्वाइन फ्लूचं प्रमाण जुलैमध्ये ४९९ आता ते ३९ झालं आहे. मात्र डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होतेय. जुलै २०२२ मध्ये राज्यात डेंग्यूचे ६६८ रुग्ण होते ते आता १४४३ वर पोहचले आहे.

4) पटकी (कॉलरा)

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पटकीचे अर्थात कॉलराचे रुग्ण कमी आढळले असले तरी मृतांची संख्या जास्त आहेत. पटकी हा जलजन्य आजार ‘व्हीब्रीओ कॉलरा’ जिवाणूमुळे होतो. जिवाणूचा आतड्याला संसर्ग झाल्याने पटकी आजार होतो. राज्यात १ जानेवारी ते जुलै-२०२२ दरम्यान कॉलराचे १९३ रुग्ण आढळले, यापैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये कॉलरा मृतांचे प्रमाण ० होते तेच आता ४.१४ टक्क्यांवर पोहचले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांतील कॉलरा मृतांचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.

5) झिका विषाणू

भारतासह जगभरात झिका विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला, एडिस या डासाद्वारे हा आजार पसरतो. याची लक्षणं सौम्य असली तरी गर्भवती महिलेला या विषाणूचा मोठा धोका आहे. महाराष्ट्रातील पुण्यात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा अशी या आजाराची लक्षण आहेत. मात्र पुण्यातील रुग्णानंतर राज्यात झिकाची एकही केस आढळली नाही.

6) निपाह विषाणू

निपाह विषाणू हा एर झुनोटिक आजार असून प्राण्यांमधून हा संसर्ग मानवांमध्ये पसरतो. वटवाघळांच्या संपर्कात आल्याने हा आजार होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या मध्यात जूनमध्ये या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून आला. यात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महबळेश्वरमधील एका गुहेतील दोन वटवाघूळांना निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. भारतात 2001 ते २०१८ पर्यंत अनेक रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला. मात्र २०२२ मध्ये अद्यापतरी या विषाणूची कोणाला लागण झालेली नाही.

7) स्क्रब टायफस

राज्यात २०२२ मध्ये स्क्रब टायफस हा एक दुर्मिळ आजारानेही शिरकाव केला आहे. बुलढाण्यात या आजाराचे आत्तापर्यंत ९ रुग्ण आढळून आहेत. ताप, पुरळ येणे, डोकं अंगदुखी अशी या आजाराची लक्षणं आहेत. हा आजार उंदीर किंवा जंगलातील दाट गवतातील एका प्रकराचा कीटक चावल्यावर होतो. या आजारावर अद्याप लस उपलब्ध नाही त्यामुळे रुग्णापासून सोशल डिस्टसिंग ठेवणे हाच उपाय आहे.

8) लम्पी विषाणू

लम्पी हा त्वचेचा आजार असून याचा संसर्ग प्राण्यांमध्ये दिसून येतो. २०२२ या वर्षात लम्पी आजारामुळे भारतात लाखो प्राण्याचा मृत्यू झाला. याचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात पाहायला मिळाला, राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये ३ लाख ५४ हजार २४७ पशुंना याचा संसर्ग झाला आहे. तर २४ हजार ७६७ पशुंचा मृत्यू झाला आहे. एलएसडी (LSD) डासाद्वारे हा विषाणू प्राण्यांमध्ये पसरला होता.

9) हार्ट अटॅकचे बळी

२०२२ मध्ये कमी वयात ह्रदयविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढल्याचे पाहायला मिळाले. ज्यात जिम करताना, डान्स करताना किंवा चालताना हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टचे बळी ठरले. सर्वसामन्यांपासून ते अनेक अॅक्टर याचे बळी ठरले. पोस्ट-कोविड लसीकरणच्या सुरवातीला हार्ट अटॅचे प्रकरणे वाढताना दिसले. कोरोना महामारीनंतर हार्ट अटॅकच्या प्रकरणात दूप्पट वाढ झाली आहे. यात तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. एका महिन्यात राज्यात आता 30 ते 35 हार्टचे रुग्ण आढळून येत आहेत.

10) मानसिक आजार

राज्यात कोरोनानंतर लोकांना स्मृतीभ्रंशापासून ते झोपेच्या विकारापर्यंत अनेक प्रकारचे गंभीर मानसिक आजारांचा सामना करावा लागतोय. मात्र या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा आजार म्हणजे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य आहे. मात्र ज्याकडे अनके जण दुर्लक्ष करतात. नैराश्यासारख्या मानसिक समस्यांमुळे महाराष्ट्रात दररोज शेकडो लोकं आत्महत्या करत आहे. यात शेतकरी आणि तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे, भविष्याची चिंता, कर्जबाजारीपणा, बेरोजगारी, बिघडलेले नाते संबंध, सोशल मीडिया यांसारख्या कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढतेय.

11) श्वसनाचे रोग

राज्यातील वाढते प्रदूषण आणि खालावत चाललेली हवेची गुणवत्ता यामुळे महाराष्ट्रात २०२२ मध्ये श्वसनाचे विकार वाढत आहे. यामुळे मृत्यूचा धोकाही वाढतोय. विशेषत: मुंबईत २०२२ मध्ये दिल्लीपेक्षा सर्वात खराब हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे. ज्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, सर्दी, डोकेदुखी सारखे आजार वाढत आहे. जे अकाली मृत्यूचे कारण बनत आहेत.


सोलापूरच्या बार्शीमध्ये फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू