Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र Monsoon 2021 : आनंदवार्ता! मान्सूनचे राज्यात जोरदार आगमन, हवामान विभागाची माहिती

Monsoon 2021 : आनंदवार्ता! मान्सूनचे राज्यात जोरदार आगमन, हवामान विभागाची माहिती

पुणे, मराठवाडा, रायगडमध्ये पावसाला सुरुवात 

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या वाटेकडे चातकाप्रमाणे डोळे लावून बसणाऱ्या जनतेसाठी एक सुखद बातमी आहे. कारण केरळमधून वेगवान वाटचाल करत आज मान्सूनने राज्यात जोरदार धडक दिली आहे. अशी माहिती नुकतीच हवामान विभागाने जाहीर केली आहे. पुण्यातील अनेक भागात आज मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यातच मुंबईतही मान्सून पूर्व पावसाचे ढग तयार झाले असून अनेक भागांत रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

पुणे, मराठवाडा, रायगडमध्ये पावसाला सुरुवात 

- Advertisement -

मान्सूनने आगेकूच करत अलिबाग, रायगड., पुणे, मराठवाड्यातही अनेक भागांत मान्सूनला सुरुवात झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने जाहीर केली अशी माहिती राज्याचे हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सूचा पुढील प्रवास आता संपूर्ण महाराष्ट्राभर सुरु झाला आहे. त्यामुळे काही तासांतच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे काही वेळातच राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोन दिवस आधीच मान्सूनची महाराष्ट्रात धडक 

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनच्या वाऱ्यांनी वेग पकडल्याने अवघ्या दोन दिवसांतच मान्सून केरळातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीचे मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यामुळे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांत मान्सून कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व्यापून टाकणार असल्याची हवामान विभागाने दिली आहे.

 कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात

- Advertisement -

राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. रविवारीपासून सुरु झालेल्या पावसामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. अनेक गावांमध्ये सध्या बळीराजा नांगरणीचे झोत हातात घेत मशागत करत आहे.


मान्सून शनिवारीच महाराष्ट्रात दाखल


 

- Advertisement -