Monsoon 2022 : यंदा जूनमध्ये पडणार इतका पाऊस, हवामान खात्याचा सुखद अंदाज

monsoon arrives in konkan information from indian meteorological department

यंदा भारतात मान्सूनने वेळेवर हजेरी लावल्याने दिलासा मिळत आहे. सर्वसाधारणपणे 1 जूनदरम्यान केरळमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनचे यंदा 29 मे रोजीच आगमन झाले. त्यामुळे मान्सून पुढील सहा दिवसांत आता तळकोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रातही दाखल होणार आहे. तर 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून मुंबई, पुण्यात पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने जून महिन्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Monsoon Update)

तसेच यंदा किती प्रमाणात पाऊस पडणार याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात मान्सून सामान्य असणार असून दीर्घकाळासाठी 103 टक्के पावसाचा अंदाज आहे. (IMD)

मान्सूनला पुढे सरकरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटक, तामिळनाडू, कोकण आणि गोव्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 2 ते 4 दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी 96 ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Monsoon Live Update )

मे महिन्यात अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर देशातील उर्वरित भागातही वेळेआधीच मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने मान्सूनबाबत नवीन अंदाज वर्तवताना जून महिन्यात शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी मिळू शकते. दरम्यान जून महिन्यात मान्सूनवर आधारित कृषी क्षेत्रातही सामान्याहून अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. मान्सूनचे आगमन झाले असले तरी राज्यात हवेचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र पुढील दोन आठवडे मान्सूनचा वेग कमी राहू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण मान्सूनचा वेग कायम राहिल्यास मान्सून तळकोकणात 4 ते 5 जूनपर्यंत पोहचू शकतो.


केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही ४० टक्के वाटा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे