घरमहाराष्ट्रदिलासा : मान्सून अलिबाग, रायगडमध्ये दाखल

दिलासा : मान्सून अलिबाग, रायगडमध्ये दाखल

Subscribe

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

कोरोना महामारीच्या नकारात्मक काळात महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आली आहे. सर्वजण वाट पाहणार्‍या मान्सूनचे अखेर राज्यात आगमन झाले. राज्यात मान्सून अलिबाग, रायगड, पुणे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोहोचला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शेतीकामाला वेग येणार आहे. तर दुसरीकडे पावसाळा येत असल्याने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपासून केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. यंदा मान्सून केरळात सामान्य वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -