राज्यात पुन्हा होणार मान्सूनची एन्ट्री; हवामान विभागाकडून 9 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जुलैमध्ये आधीच जास्त पाऊस झाला आहे आणि 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ असू शकतात.

अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आता राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 9 ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल. तर काही भागांमध्ये मध्यम ते सौम्य पाऊस पडेल.

दरम्यान, सध्या राज्यातील पालघर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच तेथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जुलैमध्ये आधीच जास्त पाऊस झाला आहे आणि 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ असू शकतात. त्यामुळे नद्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी या कालावधीत पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्यासाठी सतर्क राहावे. असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. राज्यातील, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, पुणे , सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना 6 ते 9 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा होणार मान्सूनचे आगमन
11 ऑगस्टपर्यंत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावासाचे आगमन होईल. शिवाय मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा :क्रौर्याची परिसीमा : मदतीच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार, पीडितेची प्रकृती गंभीर