Monsoon: मुंबईसह कोकणात जोरदार पावसाला सुरुवात, रत्नागिरीला ऑरेंज Alert

रत्नागिरीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु होती. मात्र काल रात्री पासून पावसाचा जोर वाढलेला पहायाला मिळत आहे.

Rain will fall in 27 districts of Maharashtra

राज्यात कालपासून विविध जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीय. आज पहाटेपासूनच मुंबई शहर उपनगरात आणि कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पुढील काही तासात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. तर कोकणात रत्नागिरीत,गुहागर जिल्ह्यात काल रात्री पावसाने दमदार हजेरी लावली आहे. चिपळून, मंडणगड,दापोली संगमेश्वर,राजापूरलाही दमदार पावसाने झोडपून काढले आहे. तर रोहा,कोलाड,पाली आणि सुधागडमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाामुळे जिल्ह्यातील ओढे पूर्ण प्रवाहित झाले आहेत. रत्नागिरीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु होती. मात्र काल रात्री पासून पावसाचा जोर वाढलेला पहायाला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरीला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Monsoon: Heavy rains begin in Mumbai, Konkan, Orange alert to Ratnagiri)

मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर कोकणातही आज संपूर्ण दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस असणार आहे. रत्नागिरीला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. रत्नागिरीतील दापोली,मंडणगडमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. दापोली,मंडणगडमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तर कोकणातील सर्व समुद्रांना उधाण आल्याचे दिसून येतेय. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या संपूर्ण परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आज ऑरेंज अलर्ज जारी करण्यात आला असला तरी लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रत्नागिरी,सिंधुदूर्ग भागात पुढील चार दिवस पाऊस असणार आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे. गेल्या २ ते ३ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसात अद्याप कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मुंबई शहर,उपनगर आणि कोकणात सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणातही अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत.


हेही वाचा – Monsoon Alert: राज्यात आगामी ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता – IMD