अखेर मान्सून परतला; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्याच्या अनेक भागांत मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरांत पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र आता अखेर मान्सून महाराष्ट्रातून परतल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याच्या अनेक भागांत मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरांत पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र आता अखेर मान्सून महाराष्ट्रातून परतल्याची माहिती समोर येत आहे. मान्सूनने रविवारी निरोप घेतल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तसेच, मान्सून परतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून मान्सून परतला आहे. यंदा राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा राज्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरील मान्सून राज्यातून बाहेर पडतो. यंदा हा देखील विक्रम मोडून मान्सून 23 ऑक्टोबरला राज्यातून बाहेर पडला आहे.

राज्यात आतापर्यंत 123 टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या तब्बल 23 टक्के अधिक पाऊस जास्त झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंमुळेच निवडून आलात; अब्दुल सत्तारांना चंद्रकांत खैरेंचे प्रत्युत्तर