घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon: महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon: महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे.

छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Chance of heavy rains in Maharashtra for next 3-4 days)  पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून गायब असलेला मान्सून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्याने बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचे बघायला मिळत नव्हते.

- Advertisement -

मराठवाड्यात मंगळवारी सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सोमवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर लातूर आणि उस्मानाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात 31 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात प्रामुख्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस बघायला मिळू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. उद्या नाशिकसाठी मात्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

विदर्भात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -