गोव्यात मान्सूनचं आगमन, महाराष्ट्रात ‘हा’ दिवस ठरू शकतो मान्सूनचा नवा मुहूर्त

monsoon arrives in konkan information from indian meteorological department

गेल्या काही दिवसांपूर्वी केरळात (Kerala) मान्सूनने (Monsoon Update) हजेरी लावली होती. त्यानंतर कर्नाटकात (Karnataka)  दाखल झालेला मान्सून मागील काही दिवसांपासून कारवार आणि चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा (Karnataka-Goa) सीमाभागात दाखल झाला आहे. मात्र, मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३ जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात उष्णतेचा कडाका अद्यापही कायम आहे.

सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रांतील काही भागांत ढगाळ वातावरण असल्याने उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या विविध भागात मान्सून दाखल झाला आहे. तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या राज्यातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे.

राज्यातील काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट जाणवत आहे. काही जिल्ह्यांमधील कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांमध्ये विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर वर्धा, नागपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात मान्सून १२ ते १३ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो ७ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता. महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

दरम्यान, पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान तज्ञ अनुपम कश्यपी यांनी राज्यात मान्सून दाखल होण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते मान्सून हा आगामी सात ते दहा दिवसात राज्यात पदार्पण करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा : Monsoon Update 2022: पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज