घरमहाराष्ट्रIMD : महाराष्ट्राला मान्सूनची अजून एक आठवड्याची प्रतीक्षा; चक्रीवादळाचा फटका

IMD : महाराष्ट्राला मान्सूनची अजून एक आठवड्याची प्रतीक्षा; चक्रीवादळाचा फटका

Subscribe

 

नवी दिल्लीः अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक लागला आहे. या आठवड्याच्या शेवटी केरळमध्ये तर पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने IMD वर्तवली आहे.

- Advertisement -

४ किंवा ५ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज IMD ने वर्तवला होता. मात्र अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक लागला आहे. १४ केंद्रांवर होणाऱ्या पावसावर मान्सूच्या प्रवासाचा अंदाज लावला जातो. या सर्व केंद्रांवर सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती आहे. पाऊस मात्र एकाच केंद्रावर सुरु आहे. त्यात चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन केव्हा होईल, यामध्ये अजून स्पष्टता नाही, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेली चक्रीवादळाची स्थिती पुढील २४ तासात अधिक तीव्र होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होईल. या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यानंतर मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होईल. त्यामुळे केरळमध्ये मान्सून या आठवड्याच्या अखेरीस दाखल होईल व त्यानंतर पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होईल. १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

४ किंवा ५ जूनला केरळच्या किनारपट्टीवर धडकणार होता

दरवर्षी केरळमध्ये 1 जूनपर्यंत दाखल होणारा मान्सून यंदा मात्र ४ किंवा ५ जूनला पोहचणार आहे. महाराष्ट्रात यावर्षी 8 दिवस उशिराने मान्सूस येणार असल्यामुळे जूनच्या 14 ते 15 तारखेपर्यंत राज्यात दस्तक देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 96 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे जूनमधे सरासरीच्या 25 टक्के कमी पाऊस पडण्याची आहे. दक्षिण-मध्य कोकणात सामान्य पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी जून महिन्यात तापमान एक-दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सुरुवातीचे काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले होते.

मान्सूनच्या विलंबामुळे महाराष्ट्रात जूनमध्ये उष्णतेची लाट

केरळमध्ये मान्सूनची प्रगती कशी होते यावर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे जूनमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. वळवाचा पाऊस पडल्यानंतर वातावरणात थोडासा गारवा पसरतो. मात्र, मुंबईमध्ये अजूनही वळवाचा न पडल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रासाचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सांताक्रूझ येथे गेल्या महिन्यात 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. हे यंदाच्या मे महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते.

राज्यात यंदा चांगला मान्सून

मान्सून यंदा ९६ ते १०४ टक्के अर्थात, सरासरी इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये मध्य भारतात विशेष करून, महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा मान्सून ९६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, वायव्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून ९६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पावसाळ्यात अल निनोची शक्यता ९० टक्के पेक्षा जास्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -