आज राज्यात महिन्याभरानंतर पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात वरूण राजाचं पुन्हा आगमन झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळाला आहे. पावसानं आज सकाळपासून अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसानं कमबॅक केलं आहे. (Monsoon Rainfall across the state including Mumbai Orange alert in these areas )
नंदूरबार नवापूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पावसानं दडी मारली होती. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार नवापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.
भंडाऱ्यात पावसाची हजेरी, शेती पिकांना मोठा दिलासा
सकाळपासून प्रखर ऊन असताना दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावासानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून उष्णतेत वाढ निर्माण झाली होती. अशात आलेल्या मुसळधार पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस शेतातील पिकांना लाभदायक ठरला आहे.
2 दिवस राज्यात पावासाचा जोर
डॉ. होसाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर या दोन दिवसात राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल. यावेळी वातावरणामध्ये हलकासा गारवाही असेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तसंच विदर्भातही समाधानकराक पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
शनिवारपर्यंत राज्यातल्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये यलो अलर्ट असणार आहे. यावेळी सर्वच भागात मुसळधार पाऊस पडेल तर 7 सप्टेंबरला विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसंच, उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रावार वारे तयार होत आहेत आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
(हेही वाचा: पुढील वर्षी रस्त्यावर किंवा चौकात दहिहंडी नको; मोकळ्या मैदानात आयोजन करावे – मुंबई उच्च न्यायालय )