घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांना दिलासा! राज्यात यंदा चांगला मान्सून; हवामान विभागाचा अंदाज

शेतकऱ्यांना दिलासा! राज्यात यंदा चांगला मान्सून; हवामान विभागाचा अंदाज

Subscribe

भारतीय हवामान खात्याकडून हवामानाचा नियमित अंदाज दिला जातोय. पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज येतो. त्यानंतर मे महिन्यात दुसरा अन् दीघकालीन अंदाज येतो. परंतु राज्यात यंदा चांगला मान्सून होण्याचा हवामान विभागाने वर्तवला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या घटकासह हिंद महासागर द्विधृव (इंडियन ओशन डायपोल) हा घटकही प्रभावी आहे. परिणामी, मान्सून यंदा ९६ ते १०४ टक्के अर्थात, सरासरी इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये मध्य भारतात विशेष करून, महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

- Advertisement -

मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची तारीख ४ जून अशी अपेक्षित ठेवली आहे. तसेच किमान चार दिवसांचा कालावधी मागे- पुढे होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाचे डॉ. डी.एस. पै यांनी व्यक्त केली.

मान्सूनवर परिणाम करणारा एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचे हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केले होते. परंतु यासोबत द्विधृव हा घटक आहे. त्याचा प्रभाव असल्यामुळे मान्सून सामान्य होणार आहे. देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस होणार आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, मान्सून ४ जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचेल. यंदा मान्सून ९६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, वायव्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून ९६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पावसाळ्यात अल निनोची शक्यता ९० टक्के पेक्षा जास्त आहे.


हेही वाचा : खुशखबर! यंदा ४ जूनला केरळात मान्सून दाखल होणार; हवामान विभागाचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -