Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Monsoon Update : 'या' तारखेला दाखल होणार मुंबईत ; IMD च्या निवृत्त...

Monsoon Update : ‘या’ तारखेला दाखल होणार मुंबईत ; IMD च्या निवृत्त अधिकाऱ्याने केले भाकीत

Subscribe

 

मुंबईः केरळमध्ये आज मान्सून दाखल झाला. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. मात्र १८ जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे, असे भाकीत हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी केले आहे.

- Advertisement -

४ किंवा ५ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र खोल अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात वादळ आले. या वादामुळे मुंबई समुद्र किनारपट्टीला सुरक्षेचा इशारा देण्यात आला होता. मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. वादळामुळे मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यास उशीर झाला.

८ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. सर्वसाधारणपणे १० जूनला मान्सून मुंबईत दाखल होतो. केरळमध्ये येण्यास मान्सूनला उशीर झाला. परिणामी यंदा १८ जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल. त्यातही मान्सूनचा वेग वाढला तर १४ ते २२ जूनच्या दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो, अशी शक्यता खुळे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचाः Mumbai Metro : पावसाळ्यासाठी मुंबई मेट्रो सज्ज, प्रवाशांच्या सेवेसाठी मान्सून कंट्रोल रूम

मुंबईसह कोकण, खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.

अखेर केरळमध्ये आज दाखल झाला मान्सून

1 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते, पण यावर्षी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्यासाठी 7 दिवसाची अवधी लागला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज (8 जून) आगमन केले आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नार परिसरात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 16 जूनला होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागानं यापूर्वी पुढील 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती दिली होती. मात्र, बदलेल्या वातावरणातील स्थितीमुळं मान्सून आजचं दाखल झाला आहे. याबाबत माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्यासाठी साधारणपणे 7 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे आज मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील सात दिवसात म्हणजे 16 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यता हवामाना विभागाने वर्तविली आहे. गेल्या 12 वर्षांचा अभ्यास केल्यावर समजते की, मान्सून महाराष्ट्रात दरवर्षी 7 जूनच्या दरम्यान दाखल झाला आहे. मात्र महाराष्ट्रात मृग नक्षत्राला दाखल होणाऱ्या मान्सूनचे समीकरण यावेळी बदलेले आहे. मान्सून आज दाखल झाल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे, तसेच केंद्र सरकार समोरील देखील चिंता आता दूर झाली आहे.

- Advertisment -