Monsoon Update : मान्सूनची अरबी समुद्रातून पुढे वाटचाल; महाराष्ट्रात केव्हा आगमन?

महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश भागांत पावसाळी वातावरण (monsoon climate)  होत आहे. त्यामुळे वातावरण ढगाळ राहणार आहे.

मान्सूनकडे डोळे लागून बसलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात रेंगाळणारा मान्सून आता पुढे सरकला आहे. (Monsoon live update)  पुढील ४८ तासांत बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या काही भागांवर पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याने अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग हा मान्सूनने व्यापणार आहे. तर मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्व-मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये पुढील 48 तासात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली आहे.

IMD च्या अंदाजानुसार, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात या आठवड्याच्या शेवटी झाली, दरम्यान केरळमध्ये (Kerala Monsoon) 27 मे पर्यंत म्हणजे पाच दिवस अगोदर मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज होता. मात्र आता 1 जूनपर्यंत केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईल असे सांगितले जात आहे. त्यानंतर उर्वरित देशात तसेच महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात होईल, जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह (Maharashtra Monsoon) उर्वरित देशात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. (Monsoon Update )

हवामान विभागाने म्हटले की, केरळ, माहे तसेच तामिळनाडूमध्ये आज म्हणजे 26 मे रोजी ही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील पाच दिवस नैऋत्य अरबी समुद्रावर आणि ईशान्य अरबी समुद्रावर तसेच 27-29 मे दरम्यान गुजरातच्या किनार्‍याजवळ वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रतितास ते 60 किमी राहिल असा अंदाज आहे.

पुढील 5 दिवस उष्णतेची लाट नाही

दरम्यान पुढील पाच दिवसांत देशभरात उष्णतेच्या (Heat Wave) लाटेची कोणतीही लक्षणीय परिस्थिती उद्भवणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगाळ हवामानामुळे दिल्लीसह देशातील इतर भागातही उष्णेच्या छळा वाढणार नाही असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात ढगाश वातावरण

महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश भागांत पावसाळी वातावरण (monsoon climate)  होत आहे. त्यामुळे वातावरण ढगाळ राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक भागांत दुपापर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर ढगाळ वातावरण अनुभवण्यास मिळत आहे. तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.


आता अनिल परब यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, किरीट सोमय्यांचा इशारा