Monsoon Update: आजही मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा

Weather Update monsoon forecast havey rainfall expected in mumbai, pune konkan, marathwada for next 4 days says imd
Weather Update: राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, मराठावाडा, विदर्भात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे शनिवारी आणि रविवार हा मुंबईसाठी काळरात्र ठरला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दरड, भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. यामध्ये तब्बल ३० निष्पाप जीव दगावले. पावसाचे रौदरुप पाहून सगळ्यांची झोप उठाली आहे. पण आज पुन्हा एकदा मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता वर्तवली आहे. सावधगिरी बाळगण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट?

पुढच्या २४ ते ३६ तासांसाठी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट?

१९ ते २२ जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात मध्यम आणि मुसळधार पाऊस?

पुढच्या ३ ते ४ तासांत सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे जळगाव आणि परभणीत मध्य स्वरुपाच्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत सिंधुदुर्गात कुठे-कुठे किती झाला पाऊस?

रत्नागिरीत गेल्या २४ तासांत किती झाला पाऊस?

गेल्या २४ तासांत पालघरमध्ये किती झाला पाऊस? 

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत किती झाला पाऊस? 

 


हेही वाचा – मुंबईतील विक्रोळी, चेंबूर, भांडूप दुर्घटनेनंतर मुसळधार पावसामुळे ठाण्यात इमारतीची कोसळली भिंत