पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण भारतात मान्सून होणार सक्रिय

मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागाच पावसाचे पाणी साचले होते. तसेच, येत्या २ ते ३ दिवसांत संपूर्ण देशभरात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Mumbai Rains

मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या (Mumbai) अनेक सखल भागाच पावसाचे पाणी साचले होते. तसेच, येत्या २ ते ३ दिवसांत संपूर्ण देशभरात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. सध्या मान्सूनने (Monsoon Season) पंजाब आणि हरियाणा व्यापला असून राजस्थानचा बहुतांश भागही मान्सूनच्या ढगांनी व्यापलेला आहे. (Monsoon will be active all over India in next 2 3 days)

कमी दाबाची पट्टा उत्तर-पश्चिम राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत खालच्या पातळीवर कायम आहे. त्यामुळं जोरदार वारे वाहू लागले आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

पुढील ५ दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. तसेच, उत्तराखंडमध्ये ५ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील गंगेच्या भागात पुढील चार ते पाच दिवसांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हलका ते मध्यम पाऊस

दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाच्या रेषेमुळे कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यानंतर पुढील 5 दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, “मागील २४ तासांत गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळचा काही भाग, ईशान्य राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेशचा काही भाग, रायलसीमा, ओडिशाचा उत्तर किनारा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम आणि अंदमान-निकोबार बेटांवरही हलका ते मध्यम पाऊस पडला आहे”, अशी माहिती स्कायमेटने दिली.


हेही वाचा – मी चौकशींच्या बाबतीत निडर; संजय राऊतांचा विरोधकांना टोला