Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे पुढील पाच दिवसांत मान्सूनचा जोर आणखी वाढणार; 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवसांत मान्सूनचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

मुंबईसह (Mumbai) राज्याच्या अनेक भागांत पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. काही परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

मुंबईसह (Mumbai) राज्याच्या अनेक भागांत पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. काही परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच येत्या पाच दिवसांत मुंबई आणि ठाणे (Thane) शहरांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. (monsoon will intensify in the next five days in mumbai and thane)

संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला असला, तरी सध्यस्थितीत आजही निम्मा महाराष्ट्र (Maharashtra) कोरडा आहे. काही भागांच उष्णतेची लाट कायम आहे. मात्र, आता हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, पुढील पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनचा (Monsoon) जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.

- Advertisement -

कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, गोव्यात १९ ते २१ जूनदरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २० आणि २१ जून रोजी घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विदर्भात १८ ते २१ जूनदरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


हेही वाचा – मुंबईत पर्यावरणस्नेही, आकर्षक एक हजार बस थांबे उभारण्यात येणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -